वारसदारांना १४ लाख रुपये भरपाई मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST2021-03-13T04:13:58+5:302021-03-13T04:13:58+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अपघातात मृत्यू झालेले सुधाकर तुर्के (रा. चंदनवाही, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) यांच्या ...

14 lakh compensation sanctioned to heirs | वारसदारांना १४ लाख रुपये भरपाई मंजूर

वारसदारांना १४ लाख रुपये भरपाई मंजूर

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अपघातात मृत्यू झालेले सुधाकर तुर्के (रा. चंदनवाही, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) यांच्या वारसदारांना १४ लाख रुपये भरपाई व त्यावर ७.५ टक्के व्याज मंजूर केले आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी हा निर्णय दिला आहे.

वारसदारांमध्ये मृताची पत्नी संगीता तुर्के व इतर तिघांचा समावेश आहे. सुधाकर तुर्के यांचा २२ एप्रिल २०१४ रोजी टिप्परने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला. ते औषधांच्या दुकानात काम करीत होते. त्यांना ६ हजार रुपये मासिक वेतन मिळत होते. वारसदारांनी भरपाईकरिता सुरुवातीला मोटर वाहन अपघात दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. २० जानेवारी २०१८ रोजी न्यायाधिकरणने त्यांना केवळ ४ लाख ८७ हजार रुपये भरपाई मंजूर केली. त्यामुळे वारसदारांनी भरपाई वाढवून मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील मंजूर करण्यात आले. भरपाईची रक्कम नॅशनल इन्शुरन्स कंपनीने द्यायची आहे.

Web Title: 14 lakh compensation sanctioned to heirs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.