मास्कशिवाय फिरणाऱ्या १४ जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:07 IST2021-06-03T04:07:02+5:302021-06-03T04:07:02+5:30

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १४ नागरिकांकडून सात हजार रुपयांचा दंड वसूल ...

14 fined for walking without mask | मास्कशिवाय फिरणाऱ्या १४ जणांना दंड

मास्कशिवाय फिरणाऱ्या १४ जणांना दंड

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १४ नागरिकांकडून सात हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३८२२७ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ७४ लाख ७२ हजारांचा दंड वसूल केला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्गाचा अद्याप धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे उपद्रव शोध पथकाद्वारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत आहे. कोरोना विषाणूचा संसर्गाचा अद्याप धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे उपद्रव शोध पथकाद्वारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत आहे.

Web Title: 14 fined for walking without mask