१४ प्रतिष्ठानांना ७५ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:08 IST2021-04-02T04:08:17+5:302021-04-02T04:08:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या एनडीएसच्या पथकांनी गुरुवारी ५३ प्रतिष्ठानांची तपासणी केली. १४ जणांकडून ...

14 establishments fined Rs 75,000 | १४ प्रतिष्ठानांना ७५ हजारांचा दंड

१४ प्रतिष्ठानांना ७५ हजारांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या एनडीएसच्या पथकांनी गुरुवारी ५३ प्रतिष्ठानांची तपासणी केली. १४ जणांकडून ७५ हजारांचा दंड वसूल केला.

लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार दंड वसूल केला. धरमपेठ झोन अंतर्गत सहा प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये दंड वसूल केला. हनुमाननगर झोनच्या पथकाने दोन प्रतिष्ठानांची तपासणी केली. धंतोलीमध्ये १५ प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये दंड वसूल केला. नेहरूनगरमध्ये चार प्रतिष्ठानांची तपासणी केली. गांधीबाग झोनच्या पथकाने तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून २५ हजार, सतरंजीपुरा पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार रुपये दंड वसूल केला. लकडगंजच्या पथकाने १४ प्रतिष्ठानांची, तर मंगळवारी झोनच्या पथकाने सात प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार दंड वसूल केला. एनडीएस पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

Web Title: 14 establishments fined Rs 75,000