१३७ कोटी एसपीव्हीच्या खात्यात वळते करणार
By Admin | Updated: March 3, 2017 02:19 IST2017-03-03T02:19:30+5:302017-03-03T02:19:30+5:30
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहराला केंद्र व राज्य शासनाकडून १३७ कोटी रुपये मिळाले आहेत.

१३७ कोटी एसपीव्हीच्या खात्यात वळते करणार
स्मार्ट सिटी योजना : पारडी, पुनापूर व भरतवाडा भागाचा विकास
नागपूर : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहराला केंद्र व राज्य शासनाकडून १३७ कोटी रुपये मिळाले आहेत. ही रक्कम नागपूर स्मार्ट सिटीसाठी तयार करण्यात आलेल्या नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कापोर्रेशन या एसपीव्हीच्या खात्यात वळती करून ही रक्कम स्मार्ट अॅन्ड सेफ सिटीसाठी वापरण्यात येणार आहे.
नागपूर शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश केल्यानंतर केंद्र सरकारने २०१६ -१७ या आर्थिक वर्षासाठी नागपूर महापालिकेला ९२ कोटी रुपये मंजूर केले. ही रक्कम राज्य शासनाकडे प्रलंबित होती. राज्य शासनाने केंद्राने मंजूर केलेल्या रकमेसह स्वत:चा ५० टक्के वाटा म्हणजेच ४५ कोटी रुपयेही एसपीव्हीला उपलब्ध केले आहेत. सध्या हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयात असून एक- दोन दिवसांत ही रक्कम एसपीव्हीच्या खात्यात वळती करण्यात येणार आहे. के ंद्र सरकारचे स्मार्ट सिटीसाठी ९० कोटी, एसपीव्हीच्या प्रशासकीय खचार्साठी २ कोटी तर राज्य शासनाचे ४५ कोटी असे एकूण १३७ कोटी एसपीव्हीच्या खात्यात जमा होतील. सध्या शहरात राज्य शासनाकडून स्मार्ट अॅन्ड सेफ सिटी या ५२० कोटींच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत १२६ कोटींची कामे करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एसपीव्हीलाही आपला हिस्सा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी मिळालेल्या रकमेतून एसपीव्ही स्मार्ट अॅन्ड सेफ सिटीकरिता राज्य शासनाला रक्कम देणार आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ‘टाऊन प्लानिंग स्कीम’ सुरू होणार आहे. प्रकल्प व्यवस्थापन केंद्रातर्फे (प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट) ह्यटाऊन प्लानिंग स्किमह्णची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी तीन प्रस्ताव आले असून यातील एकाची निवड करून ही योजना राबविली जाणार आहे. एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत पारडी, पूनापूर, भरतवाडा येथे पायाभूत सुविधांसोबत ड्रेनेज लाईन, पथदिवे याशिवाय चार हजार स्वस्त घरांची योजना आहे. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)