१.३४ हजाराचा ऐवज पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:08 IST2021-03-27T04:08:53+5:302021-03-27T04:08:53+5:30

काटाेल : चाेरट्याने घरफाेडी करीत राेख रक्कम आणि साेन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ...

1.34 thousand was stolen | १.३४ हजाराचा ऐवज पळविला

१.३४ हजाराचा ऐवज पळविला

काटाेल : चाेरट्याने घरफाेडी करीत राेख रक्कम आणि साेन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना काटाेल शहरातील सरस्वतीनगरात गुरुवारी (दि. २५) मध्यरात्री घडली.

हेमंत बाबूराव भजन (४१, रा. खामली, ता. काटाेल) हे कुटुंबासह काटाेल शहरातील सरस्वतीनगरात किरायाने राहतात. ते कुटुंबीयांसह त्यांच्या मूळ गावी गेले हाेते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने बॅगमधील ९४ हजार ७९० रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने आणि ४० हजार रुपये राेख असा एकूण १ लाख ३४ हजार ७९० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. घरी चाेरी झाल्याचे लक्षात येताच हेमंत भजन यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक आकाश शाही करीत आहेत.

Web Title: 1.34 thousand was stolen