शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

१३२ औद्योगिक संस्थांना मिळणार नवी ओळख ; नामकरणास मान्यता देण्याचा निर्णय जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:18 IST

Nagpur : राज्यात ४१९ शासकीय व ५८५ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसोबतच त्या संस्थेच्या नावातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी विविध महनीय व्यक्तिमत्त्वांची नावे देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुसार राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आता महनीय व्यक्तींची नावे देण्यात आली असून, तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

ग्रामीण व शहरी भागातील युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे व खासगी औद्योगिक आस्थापनांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्यात ४१९ शासकीय व ५८५ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत.

प्रथम १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. त्यांनतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील १३२ आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

नागपूरच्या संस्थांची नावे हिंगणा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आता श्री संत गमाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळमेश्वर नागपूर येथील स्व. आप्पा साहेब हळदे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुही येथील श्री संत रुख्खड महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नरखेड येथील श्री अमृत महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावनेर येथील स्व. अण्णाजी कुबिटकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरेड येथील स्व. भैयाजी दाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, काटोल येथील महर्षी पतंजली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशी नावे देण्यात आली आहे.

टॅग्स :nagpurनागपूर