२० प्रतिष्ठानांना १.३० लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:06 IST2021-06-04T04:06:59+5:302021-06-04T04:06:59+5:30

मनपाची कारवाई : ६४ प्रतिष्ठानांची तपासणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या एनडीएस जवानांनी गुरुवारी २० प्रतिष्ठानांवर कारवाई करून ...

1.30 lakh fine to 20 establishments | २० प्रतिष्ठानांना १.३० लाखाचा दंड

२० प्रतिष्ठानांना १.३० लाखाचा दंड

मनपाची कारवाई : ६४ प्रतिष्ठानांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या एनडीएस जवानांनी गुरुवारी २० प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ३० हजारांचा दंड वसूल केला. पथकाने ६४ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली.

लक्ष्मीनगर झोनअंतर्गत दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार, धरमपेठमध्ये चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार, धंतोलीच्या पथकाने ९ दुकानांची तपासणी करून ५ हजारांचा दंड वसूल केला. नेहरूनगर येथे पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार रुपये, गांधीबाग येथे आठ प्रतिष्ठानांची तपासणी करून ४० हजार रुपये, सतरंजीपुरा येथे तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये, आशीनगर पथकाने दहा प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजारांचा, तर मंगळवारी झोन पथकाने १२ प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन‌ बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोध पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.

Web Title: 1.30 lakh fine to 20 establishments