चेन्नई मार्गावरील १३ गाड्या रद्द
By Admin | Updated: December 8, 2015 03:57 IST2015-12-08T03:57:46+5:302015-12-08T03:57:46+5:30
चेन्नईत झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मागील सहा दिवसांपासून या

चेन्नई मार्गावरील १३ गाड्या रद्द
नागपूर : चेन्नईत झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मागील सहा दिवसांपासून या मार्गावरील रेल्वेगाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगळवारी रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील १३ रेल्वेगाड्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नईत मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे तेथील रेल्वे रुळावर पाणी साचून रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, या मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात येत आहेत. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार मंगळवारी ८ डिसेंबरला नागपूरमार्गे चेन्नईला ये-जा करणाऱ्या १३ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांना त्यांच्या तिकिटाची १०० टक्के रक्कम परत करण्यात येत आहे. दरम्यान, रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची माहिती देण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात विशेष कक्ष सुरूकरण्यात आला आहे. (प्रतिनिधी)