आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपूर येथे सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी १२०० वाहनांची आवश्यकता असून आतापर्यंत ११० वाहने प्रशासनाकडे जमा झाली.११ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाचे सत्र सुरू होणार आहे. या निमित्त संपूर्ण मंत्रिमंडळच मुंबई येथून नागपूरला स्थानांतरित होणार आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्य सचिवांपासून कक्ष अधिकारी, कर्मचारीही येथे येणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी वाहनांची जुळवाजुळव प्रशासनाकडून करण्यात येते. प्रशासनातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनानिमित्त १२०० वाहनांची प्रशासनाला आवश्यकता आहे. अनेक विभागाकडून वाहनच देण्यात येत नाही. त्यामुळे वेळेवर मोठी तारांबळ उडते. गेल्या काही वर्षाचा अनुभव लक्षात घेता यंदा आधीच जास्त वाहनांची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. १५५६ वाहनांसाठी विविध विभागाकडे मागणी करण्यात आली आहे. यात नागपूर विभागातून ६००, अमरावती विभागातून ३७५, औरंगाबाद विभागातून २९५ तर नाशिक विभागातून २८६ वाहनांची मागणी करण्यात आली आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी हवी आहेत तब्बल १२०० वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 10:44 IST
नागपूर येथे सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी १२०० वाहनांची आवश्यकता असून आतापर्यंत ११० वाहने प्रशासनाकडे जमा झाली आहेत.
नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी हवी आहेत तब्बल १२०० वाहने
ठळक मुद्देसध्या ११० वाहने जमा विविध विभागांकडे मागणी