शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

बनावट धनादेशाद्वारे १२ लाखांची उचल

By admin | Updated: May 28, 2014 00:54 IST

सेलू तहसील कार्यालयाकडे असलेल्या बॅक ऑफ इंडियाच्या धनादेश पुस्तिकेचा क्रमांक मिळवून त्याच क्रमांकाच्या बनावट चेक बुकचा आधार घेत तीन धनादेशाच्या माध्यमातून

सेलू तहसीलच्या खात्यातून काढली रक्कम : शेतकर्‍यांना मदतीच्या धनादेश क्रमांकाचा गैरवापर

वर्धा : सेलू तहसील कार्यालयाकडे असलेल्या बॅक ऑफ इंडियाच्या धनादेश पुस्तिकेचा क्रमांक मिळवून त्याच क्रमांकाच्या बनावट चेक बुकचा आधार घेत तीन धनादेशाच्या माध्यमातून सेलू तहसीलच्या बँक खात्यातून नरेश सी. चैनानी या नावाने तब्बल ११ लाख ९0 हजार ७६0 रुपयांची परस्पर उचल केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

सदर धनादेश हे सेलू येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून न वटविता ते थेट याच बँकेच्या धुळे येथील शाखेतून वटविण्यात आले. सेलू तहसीलकडे लोकल क्लिअरन्स चेक बुक आहे. मात्र वटलेले धनादेश हे मल्टीसिटी क्लिअरन्सचे असल्याची बाब स्कॅन कॉपीवरुन पुढे आली आहे. याचाच फायदा नरेश चैनानी याने घेतल्याचे समजते. सदर धनादेशाचे क्निअरन्स सेलूच्या बँक ऑफ इंडियातून न करता ते देखील धुळे येथीलच एचडीएफसी बँकेतून झाल्याची बाब तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर यांनी सहकार्‍यांसह केलेल्या सखोल चौकशीत उघड झाल्याचे समजते. तीन धनादेश न वटल्यामुळे सेलू तहसील कार्यालयाचे १७ लाख ७१ हजार ९६0 रुपये बचावले आहे. लखनौचा पत्ता असलेला एक इसम बँक ऑफ इंडियाकडून सेलू तहसील कार्यालयाला आधीच इश्यू झालेल्या क्रमांकाचे चेक बुक मिळवितो. ज्या क्रमांकाच्या धनादेशाच्या आधारे शेतकर्‍यांना नुकसान भरपाईपोटी मदत दिली त्याच क्रमांकाच्या आधारे दुसरे मोठय़ा रकमेचे धनादेश वटवितो, यावरुन या व्यवहारात मोठी लिंक असल्याचा संशय आहे. बँक ऑफ इंडियाची धुळे शाखाही संशयाच्या भोवर्‍यात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)