ओव्हरलोड वाहनांवर १२ लाखांचा दंड()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:26 IST2020-12-04T04:26:26+5:302020-12-04T04:26:26+5:30
नागपूर : क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक (ओव्हरलोड) करणाऱ्या १०वर वाहनांवर कारवाई करीत, १२ लाखांवर दंड वसूल करण्यात आला. ...

ओव्हरलोड वाहनांवर १२ लाखांचा दंड()
नागपूर : क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहतूक (ओव्हरलोड) करणाऱ्या १०वर वाहनांवर कारवाई करीत, १२ लाखांवर दंड वसूल करण्यात आला. प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर ग्रामीणने ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, परिवहन आयुक्त कार्यालयातून आलेल्या भरारी पथकाने सुद्धा नागपुरात येऊन कारवाई केली.
शहरात मोठ्या प्रमाणात क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणारी वाहने दृष्टीस पडतात. शिवाय, नियमांचे उल्लंघन करीत अनेक खासगी ट्रक मालवाहतूक करताना आढळून येतात. यामुळे रस्त्यांची दुर्दशा तर होतेच अपघाताची शक्यताही वाढते. यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. बजरंग खरमाटे यांनी ओव्हरलोड वाहनांवर कारवाईच्या मोहिमेला गती दिली आहे. गुरुवारी दहा वाहनांवर कारवाई केली. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात १३७ वाहनांवरच कारवाई करण्यात आली आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी खरमाटे म्हणाले, ओव्हरलोड वाहनांवर कारवाईची मोहीम सुरूच राहणार आहे. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने आणखी तीव्र करण्यात येणार आहे. या कारवाईच्या संदर्भात समाजविघातक अनेकवेळा अपप्रचार करतात, यामुळे वाहनचालकांनी याला बळी पडू नये. वाहनचालकांच्या काही तक्रारी असतील त्यांनी कार्यालयाला द्याव्यात, असेही ते म्हणाले. ही कारवाई, मोटार वाहन निरीक्षक परिक्षित पाटील, भारत जाधव, राजू नागरे, योगेश खैरनार, सतीश नवघरे, सतीश धुंडे, विजयसिंग राठोड, रोहन सासने, मोनिका राठोड व किरण शिंदे यांनी केली.