शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

विदर्भात १,१६५ नवे रुग्ण, ३८ मृत्यू; रुग्णसंख्या ४१,०८५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 20:49 IST

विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येत दरदिवसाला हजार रुग्णांची भर पडत आहे. सोमवारी १,१६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून ३८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ४१,०८५ तर मृतांची संख्या १,२५१ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देमृतांची संख्या १,२५१ नागपुरात ७१५ तर यवतमाळ जिल्ह्यात ९५ रुग्ण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येत दरदिवसाला हजार रुग्णांची भर पडत आहे. सोमवारी १,१६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून ३८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ४१,०८५ तर मृतांची संख्या १,२५१ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे १८ ऑगस्टपासून वाशिम जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. परंतु नागपूरसह, यवतमाळ, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर व आता बुलडाण्यातही रुग्ण वाढताना दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात ७१५ रुग्णांची नोंद झाली, तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या २१,१५४ झाली असून मृतांची संख्या ७६२ वर गेली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, आज जेवढे रुग्ण पॉझिटिव्ह आले त्यापेक्षा जास्त, ९७९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत १२,०३२ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात आढळून आले. ९४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शिवाय, दोन रुग्णांचा मृत्यूही झाला. रुग्णसंख्या २,७१४ तर मृतांची संख्या ६९ वर गेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. ४७ रुग्ण पॉझिटिव्ह व एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १,४९५ तर मृतांची संख्या १६ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ५५ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या २,६३५ झाली आहे.

अमरावती जिल्ह्यात ४० रुग्णांचे निदान झाले. रुग्णसंख्या ४,६१३ वर पोहचली आहे. गोंदिया जिल्ह्यात ४५ रुग्ण पॉझिटिव्ह व एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. बाधितांची संख्या १,०५९ तर मृतांची संख्या १५ झाली आहे. अकोला जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. ६९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ३,५४४ वर गेली आहे. भंडारा जिल्ह्यात ३९ रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ८५९ तर मृतांची संख्या १४ झाली आहे.

वर्धा जिल्ह्यात ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ६६५ झाली आहे. या जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. बळींची संख्या १९ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्या ९१६ वर पोहचली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस