मास्क न वापरणाऱ्या ११६ नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:08 IST2021-03-09T04:08:40+5:302021-03-09T04:08:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या ११६ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ...

116 citizens fined for not wearing masks | मास्क न वापरणाऱ्या ११६ नागरिकांना दंड

मास्क न वापरणाऱ्या ११६ नागरिकांना दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या ११६ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ५८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३५,११८ नागरिकांविरुद्ध कारवाई करुन १ कोटी ५९ लाख १८ हजारांचा दंड वसूल केला.

उपद्रव शोध पथकांनी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत ४०, धरमपेठ ८, हनुमाननगर ३, धंतोली ७, नेहरूनगर १०, गांधीबाग ६, सतरंजीपुरा ७, लकडगंज १०, आशीनगर १०, मंगळवारी १२ आणि मनपा मुख्यालयातील ३ जणांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ५०० रुपये याप्रमाणे आतापर्यंत २९,६४८ नागरिकांकडून १ कोटी ४८ लाख २४ हजार वसूल करण्यात आले आहे.

नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे अशा सूचना नागपूर मनपाद्वारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन मनपाने केले आहे.

Web Title: 116 citizens fined for not wearing masks