१५१ जागांसाठी ११४१ उमेदवार मैदानात
By Admin | Updated: February 8, 2017 02:52 IST2017-02-08T02:52:42+5:302017-02-08T02:52:42+5:30
महापालिके च्या १५१ जागांसाठी १२ झोनमधून १८१३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते.

१५१ जागांसाठी ११४१ उमेदवार मैदानात
४३३ जणांची माघार : निवडणूक चिन्हांचे आज वाटप
नागपूर : महापालिके च्या १५१ जागांसाठी १२ झोनमधून १८१३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. यातील ४३३ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असून, आता ११४१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.
बुधवारी उमेदवारांना निवडणूक निशाणीचे वाटप केले जाणार आहे. गांधीबाग झोनमधील सर्वाधिक ५७ उमेदवारांनी माघार घेतली तर धंतोली झोनमधील सर्वात कमी १५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. उमेदवारांना बुधवारी निवडणूक निशाणीचे वाटप केले जाणार आहे.
निर्धारित कालावधीत १८१३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील १७१ उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर १५७४ उमेदवार शिल्लक राहिले. ६ फे ब्रुवारीला १२ झोनमध्ये ८१ उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी मागे घेण्याच्या अखरेच्या दिवशी मंगळवारी ३५२ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. विशेष म्हणजे गांधीबाग व लकडगंज झोनमध्ये प्रत्येकी चार प्रभाग आहेत. उर्वरित नऊ झोनमध्ये प्रत्येकी तीन प्रभाग आहेत. परंतु उमेदवारीचा विचार करता आसीनगर झोनमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत. या झोनमध्ये १३५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. सर्वात कमी ५० उमेदवार लक्ष्मीनगर झोनमध्ये आहेत.(प्रतिनिधी)