नागपूर-इटारसी मार्गावरील ११ रेल्वेगाड्या रद्द
By Admin | Updated: July 10, 2015 02:41 IST2015-07-10T02:41:11+5:302015-07-10T02:41:11+5:30
इटारसी रेल्वेस्थानकाजवळ रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही रुळावर आलेली नाही.

नागपूर-इटारसी मार्गावरील ११ रेल्वेगाड्या रद्द
प्रवाशांची गैरसोय : वाहतूक विस्कळीतच
नागपूर : इटारसी रेल्वेस्थानकाजवळ रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही रुळावर आलेली नाही. त्यामुळे शनिवारी ११ जुलैला एकूण ११ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
१७ जूनला इटारसी रेल्वेस्थानकाजवळील रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला आग लागली होती. त्यानंतर नागपूर-इटारसी मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. विस्कळीत झालेली वाहतूक अद्यापपर्यंत रुळावर आलेली नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रद्द केलेल्या रेल्वेगाड्यांची माहिती मिळविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ०७१२-२५६४३४३ हा हेल्पलाईन क्रमांक तसेच नागपूर रेल्वेस्थानकावर मदत केंद्र सुरू केले आहे. (प्रतिनिधी)