जि.प.च्या शिक्षण विभागात ११ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:10 IST2021-03-04T04:10:46+5:302021-03-04T04:10:46+5:30

नागपूर : फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा धास्ती भरली आहे. गेल्या वर्षी जि.प.च्या ...

11 positives in the education department of ZP | जि.प.च्या शिक्षण विभागात ११ पॉझिटिव्ह

जि.प.च्या शिक्षण विभागात ११ पॉझिटिव्ह

नागपूर : फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा धास्ती भरली आहे. गेल्या वर्षी जि.प.च्या मुख्यालयात ४० वर कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या महिन्यात शिक्षण विभाग हॉटस्पॉट ठरण्याची भीती आहे. येथे ११ पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जिल्हा परिषद मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अभ्यागतांनी उगीचच गर्दी करू नये, असा फलक लावण्यात आला आहे़ तरीही काही केल्या ही गर्दी कमी व्हायचे नाव घेत नाही़ कर्मचारी त्यामुळे मात्र धास्तावलेले आहेत.

१ मार्च रोजी शिक्षण विभागात चार कर्मचारी पॉझिटिव्ह आढळलेत. यापूर्वी सात कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला. एकाच विभागात ११ जण पॉझिटिव्ह निघाल्याने शिक्षण विभाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. येथील कर्मचाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. सीईओ योगेश कुंभेजकर यांनी शंभर टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक केली आहे. जिल्हा परिषदेत वाढते संक्रमण लक्षात घेता कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती असावी, असे मत कर्मचाऱ्यांचे आहे. त्यातच शिक्षण विभागावर नेहमी कमी मनुष्यबळामुळे कामाचा ताण आहे. आरटीई प्रवेश, ऑनलाइन अभ्यासक्रम, बिंदुनामावलीच्या कामात कर्मचारी गुंतले आहेत. यापूर्वी जिल्हा परिषदेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सहा कर्मचारी पॉझिटिव्ह निघालेत. मार्च एन्डिंग आणि पाणीटंचाईची कामे व शिष्यवृत्तीची प्रकरणे घेऊन रोज येणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे ऑनलाइन कामांना प्राधान्य द्यावे. स्थितीवर नियंत्रण मिळेस्तोवर ५० टक्के कर्मचारी संख्या असावी, अशी मागणी जोर धरत आहे़

Web Title: 11 positives in the education department of ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.