शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील वाहन विक्रीत ११ टक्क्यांनी घट; इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 15:25 IST

Nagpur : या वर्षात २३,६२० वाहनांची नोंद इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात अनेक वाहन निर्मात्या कंपन्या विविध कार्स बाजारात आणत आहेत. या कार्सना भारतीय ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. अनेक कार कंपन्या सध्या इलेक्ट्रिक कार्स बनवण्याकडेसुद्धा लक्ष केंद्रित करत आहे. नावाजलेल्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीच्याही जाहिराती होऊ लागल्या आहेत. एकीकडे नवनवीन वाहने मार्केटमध्ये लाँच होत असतानाच दुसरीकडे मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत वाहन विक्रीमध्ये ११ टक्क्याने घट झाल्याचे पुढे आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरकडून मिळालेल्या माहिती अधिकारातील माहितीवरून हे वास्तव समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ता अभय कोलारकर यांना ही माहिती मागितली होती. उपलब्ध माहितीनुसार, २०१९ मध्ये विक्री झालेल्या २५ हजार ३५७ वाहनांची नोंद नागपूर शहर आरटीओमध्ये झाली. त्यानंतर सलग दोन वर्षे कोरोनाचा महामारीमुळे वाहन विक्रीवर मोठा परिणाम झाला. २०२० मध्ये १६ हजार ८०४ तर २०२१ मध्ये १९ हजार ३०२ वाहनांची नोंदणी झाली. २०२२ पासून परिस्थिती बदलू लागली. 

या वर्षात २४ हजार ३६७ वाहनांची नोंदणी झाली तर २०२३ मध्ये मागील पाच वर्षांतील सर्वाधिक, २६ हजार ७३१ वाहनांची नोंदणी झाली. २०२४ मध्येही वाहनांची विक्री वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र जानेवार ते नोव्हेंबरपर्यंत २३ हजार ६२० वाहनांची नोंदणी झाली. मागील वर्षीच्या तुलनेत कमी वाहनांची विक्री झाल्याचे दिसून येते

३ हजार ७०७ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी एकूण वाहन विक्रीमध्ये घट झाली असली तरी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. १ नोव्हेंबर २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या काळात १ हजार ९७२, १ नोव्हेंबर २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या काळात ३ हजार ७५६ तर १ नोव्हेंबर २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ३ हजार ७०७ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली.

५० हजारांवर दुचाकी व २२ हजार कारची नोंदणी २०२२ ते २०२४ या वर्षांत शहर आरटीओ कार्यालयात ५० हजार २७३ तर २२ हजार ७२६ कार्सची नोंदणी झाली. या शिवाय १६५ बस, ५९५ ई-रिक्षा, १,६४६ गूड कॅरिअर, ८८० मोटार कॅब, ६४३ ऑटोरिक्षा यासह इतरही वाहने मिळून ७८ हजार २६३ वाहनांची नोंद झाली आहे.

वर्ष                       वाहन नोंदणी२०१९                       २५,३५७ २०२०                       १६,८०४ २०२१                       १९,३०२ २०२२                       २४,३६७ २०२३                       २६,७३१ २०२४                       २३,६२०

 

टॅग्स :nagpurनागपूरAutomobileवाहन