११ जुगाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST2021-02-05T04:43:15+5:302021-02-05T04:43:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माैदा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माैदा शिवारात सुरू असलेल्या जुगारावर धाड ...

११ जुगाऱ्यांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
माैदा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माैदा शिवारात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून जुगार खेळणाऱ्या ११ जणांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, वाहने व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण ३ लाख ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नीतेश ज्ञानेश्वर टेकाम (वय २५), प्रणय पुरुषाेत्तम खाेटे (२२), दीपक बबनराव बरडे (३७), रवींद्र जागाेबाजी मानकर (४०), विठ्ठल शामराव ढाेबळे (४६), नितीन मुरलीधर पाेटभरे (३२), शेखर रमेश नाकाडे (३६), मंगेश श्रावण भुसारी (३२), आशिष रामेश्वर कावळे (२०), आशिष नारायण बांते (३१) व पंकज देवानंद साकाेरे (३०, सर्व रा. माैदा) यांचा समावेश आहे.
माैदा शिवारात रवींद्र मानकर यांच्या शेतात जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तेथे पाहणी केली. तिथे जुगार सुरू असल्याचे लक्षात येताच धाड टाकली आणि जुगार खेळणाऱ्या ११ जणांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून ३३ हजार रुपये रोख, ३ लाख ५,००० रुपये किमतीची सात दुचाकी वाहने व जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण ३ लाख ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी माैदा पाेलीस ठाण्यात कलम १२ मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला असून, तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, पाेलीस हवालदार विनाेद काळे, शैलेश यादव, सत्यशील काेठारे, वीरेंद्र नरड, प्रणय बनाफर, साहेबराव बहाळे यांच्या पथकाने केली.