शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आणि.. अवघ्या १० मिनिटांत जमा झाले शेतकऱ्यांचे ११ कोटींचे अनुदान; चंद्रशेखर बावनकुळे यांचा अतिरिक्त मुख्य सचिवांना फोन

By कमलेश वानखेडे | Updated: May 22, 2023 19:26 IST

Nagpur News महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान सरकारकडे रखडले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी या मुद्यावर जिल्हा बँक गाठली.

कमलेश वानखेडे

नागपूर : महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान सरकारकडे रखडले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी या मुद्यावर जिल्हा बँक गाठली. तेथूनच सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार व सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यानंतर १० मिनीटातच शेतकऱ्यांच्या अनुदानाचे ११ कोटी ६ लाख ७४ हजार २२१ रुपये बॅंकेच्या खात्यात जमा झाले. जिल्ह्यातील २ हजार ३६२ लाभार्थ्यांच्या खात्यात ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन राशी मिळणार आहे.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा झाले नसल्याच्या तक्रारी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आल्या होत्या. याची तातडीने दखल घेत बावनकुळे यांनी जिल्हा बँकेचे महालातील मुख्यालय गाठले. तेथे बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.आर. नाईक यांच्याशी चर्चा केली असता हे अनुदान सरकारकडे रखडल्याचे निदर्शनास आले. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी अडचणींचा पाढाच वाचला. अडचणी समजून घेत बावनकुळे यांनी सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार व सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला व शेतकऱ्याच्या अडचणी सोडविण्यासाठी तातडीने प्रोत्साहन अनुदान जारी करण्याची विनंती केली.

यावर अतिरिक्त मुख्य सचिवांनी आजच अनुदान जारी केले जाणार असल्याचे सांगितले. काही वेळ बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांच्या समस्येबाबत बोलत असतानाच १० मिनिटांच्या आत मध्यवर्ती बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना अनुदान बॅंकेकडे वळते करण्यात आल्याची बातमी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.आर. नाईक यांनी बावनकुळे यांना दिली.

आतापर्यंत २५९४ खातेधारकांना लाभ-२०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांच्या कालावधीत कर्ज घेऊन कोणतेही दोन वर्षे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची प्रोत्साहन राशी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या योजनेचे नागपूर जिल्ह्यातून ७,३७३ शेतकरी पात्र ठरले जहोते. तर मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे २,६५० पात्र खातेधारक प्रोत्साहनपर राशीच्या प्रतिक्षेत होते. त्यापैकी २३५ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ काही दिवसांपूर्वी मिळाला होता. सोमवारी श्री बावनकुळे यांच्या प्रयत्नाने २,३६२ खातेधारकांच्या खात्यात प्रोत्साहनपर राशी मंगळवारी जमा केली जाणार आहे. उर्वरित ५३ खातेधारकांना देखील तातडीने प्रोत्साहन राशी मिळावी यासाठी बॅंककडून पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती असल्याची माहिती नाईक यांनी दिली.

कर्जधारकांची समस्या सोडविणार- अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडे थकित असणाऱ्या कर्जाची माहिती देखील बावनकुळे यांनी घेतली. अशा शेतकऱ्यांच्या समस्या देखील सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची हमी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना व उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी दिली.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे