शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

समीर जोशीसह ११ जणांवर आरोप निश्चित

By admin | Updated: January 7, 2016 03:27 IST

एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी...

नागपूर : एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी व त्याची पत्नी पल्लवी जोशी यांच्यासह एकूण ११ जणांविरुद्ध बुधवारी भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, २०१, ३४, महाराष्ट्र गुंतवणूकदार हित संरक्षण कायदा (एमपीआयडी) यामधील कलम ३ व भारतीय रिझर्व्ह बँक कायद्यातील कलम ४५ (एस), ५८(ब) व ५ (ए) अंतर्गत आरोप निश्चित केले. यापैकी भादंविच्या कलम ४०९ मध्येच जन्मठेपेची तरतूद आहे. या कलमावर जोशीने आक्षेप घेतला होता. न्यायालयाने त्याचे आक्षेप फेटाळून ही कलम कायम ठेवली आहे.अन्य आरोपींमध्ये श्रीकांत प्रभुणे, निशिकांत मायी, दिलीप डांगे, मोहन पितळे, मुकुंद पितळे, नितीन केसकर, शंतनू कुऱ्हेकर, आनंद जहागीरदार व मनोज तत्वादी यांचा समावेश आहे. सध्या समीर जोशी व मनोज तत्वादी हे दोनच आरोपी कारागृहात असून अन्य आरोपी जामिनावर बाहेर आहेत. १४ सप्टेंबर २०१३ रोजी सोमलवाडा येथील अमित मोरे यांच्या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आतापर्यंत १२४४ गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. फसवणुकीची रक्कम १०० कोटीवर गेली आहे. शासनातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. बी. एम. करडे तर, आरोपींतर्फे अ‍ॅड. सुभाष घारे, अ‍ॅड. आनंद देशपांडे आदींनी कामकाज पाहिले.केले का नवीन वर्ष साजरेसमीर जोशीने गेल्या ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पोलीस शिपायाच्या मदतीने कारागृहाबाहेर निघून नवीन वर्ष साजरे केले असे वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशित झाले होते. यावरून न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी ‘केले का नवीन वर्ष साजरे’ अशी विचारणा समीर जोशीला केली. त्यावर जोशीने ‘याबाबत मला काहीच माहिती नाही, पोलिसांना विचारा’ असे उत्तर न्यायाधीशांना दिले. आरोप निश्चित करण्यासाठी सर्व आरोपींना न्यायाधीशांसमक्ष उपस्थित करण्यात आले होते. समीर जोशी अगदी समोर उभा होता. तो समोर येताच न्यायाधीशांनी सर्वप्रथम नवीन वर्षाच्या जल्लोषाचा विषय काढला.एमपीआयडी विशेष न्यायालय :जन्मठेपेच्या तरतुदीचे कलम कायमकौस्तुभ मुक्तेला ‘पीसीआर’श्रीसूर्या गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात पोलिसांनी कौस्तुभ मुक्ते या आणखी एका एजंटला अटक केली आहे. तो स्वावलंबीनगर येथील रहिवासी आहे. संबंधित न्यायालयाने बुधवारी मुक्तेची ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत (पीसीआर) रवानगी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, मुक्तेने गुंतवणूकदारांकडून सुमारे ६६ लाख रुपये जमा करून जोशीला दिले. त्या मोबदल्यात मुक्तेला १८ लाख रुपये कमिशन मिळाले आहे.