१०८ वा दीक्षांत समारंभ २३ एप्रिलला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:13 IST2021-02-23T04:13:27+5:302021-02-23T04:13:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ कधी होणार, यासंदर्भात ...

108th Convocation Ceremony on April 23? | १०८ वा दीक्षांत समारंभ २३ एप्रिलला?

१०८ वा दीक्षांत समारंभ २३ एप्रिलला?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ कधी होणार, यासंदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यापीठाकडून हा समारंभ २३ एप्रिल रोजी आयोजित करण्यावर विचार सुरू आहे. मात्र ‘कोरोना’मुळे आयोजन करावे की पुढील तारीख शोधावी, यासंदर्भात संभ्रम कायम आहे.

‘कोरोना’च्या वर्षात ‘न भूतो न भविष्यती’ परिस्थितीत अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षांत समारंभ आयोजित करण्याबाबत काहीच निश्चिती झालेली नाही. विद्यापीठ आता हिवाळी परीक्षांच्या नियोजनात आहे. त्यामुळे ‘ऑनलाईन’ माध्यमातून झालेल्या परीक्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभासाठी किती प्रतीक्षा करावी लागणार, असे प्रश्न विचारण्यात येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने २३ एप्रिल ही तारीख ठरविण्यावर विचार सुरू केला आहे. मात्र तोपर्यंत ‘कोरोना’ आटोक्यात आला नाही तर पुढे काय करावे, यासंदर्भात लवकरच चर्चा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

विशेष दीक्षांत समारंभाचे काय?

नागपूर विद्यापीठातर्फे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना ‘एलएलडी’ (डॉक्टर ऑफ लॉ) ही मानद पदवी प्रदान करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषद व ‘सिनेट’ने मंजूर केला होता. यासाठी ३ एप्रिल रोजी विशेष दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचे नियोजन आहे. मात्र ‘कोरोना’मुळे आता हा समारंभ ‘पोस्टपोन’ करावा लागतो की काय, असा प्रश्न प्रशासनासमोर पडला आहे.

Web Title: 108th Convocation Ceremony on April 23?