लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात रस्त्यावर असलेले तब्बल १०८७ विजेचे खांब धोकादायक आहेत. हे खांब हटविण्यासाठी शहरातील वीज ग्राहकांनी २०११ ते २०१४ दरम्यान प्रत्येक युनिट मागे ९ पैसे दिलेले आहेत. परंतु आर्थिक परिस्थिती खालावल्याने मनपाला खांब हटविण्यासाठी पैसे उपलब्ध करू शकले नाही. दुसरीकडे वीज वितरण कंपनी महावितरणने आपले हात झटकले आहे. परिणामी शहरातील वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.२००१-०२ मध्ये शहरात आयआरडीपीअंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. यादरम्यान अनेक वीज खांब रस्त्यांच्या मध्ये आले. मध्ये मनपा व महावितरणने संयुक्तपणे खांब हटविण्यासाठी सर्वे केला. २०११ मध्ये ९१.५ कोटीचे इस्टीमेट तयार झाले. मनपा व महावितरण दोघेही अर्धा अर्धा खर्च उचलणार होते. महावितरणने विद्युत नियामक आयोगाच्या माध्यमतून आपला हिस्सा देण्यासाठी तीन वर्षापर्यंत वीज बिलाच्या माध्यमतून वसुली केली. दुसरीकडे मनपाने केवळ २०.५ कोटी रुपये खर्च केले. ४१ कोटीचे काम होताच खांब हटविण्याचे काम बंद करण्यात आले. ५० कोटीचे काम प्रशासनिक कामात अडकले. आता मनपा असा दावा करीत आहे की, त्यांना सरकारकडून अनुदान मिळाले आहे आणि महावितरणला इस्टीमेट तयार करण्यास सांगण्यात आले आहे.महावितरणनेही सांगितले आहे की, इस्टीमेट तयार केले जात आहे. दुसरीकडे रस्त्यांच्या मध्ये आलेल्या वीज खांबांची यादी वीज वितरण फ्रेंचायसी एसएनडीएलने महावितरणला सोपविली असून, ते हटविण्यासाठी मदत मागितली आहे. मनपा व महावितरणच्या एकूणच कामाची गती पाहता खांब हटविण्याचे काम तातडीने होणार नाही, हे स्पष्ट दिसून येत आहे.
नागपूर शहरात १०८७ वीज खांब धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 20:45 IST
शहरात रस्त्यावर असलेले तब्बल १०८७ विजेचे खांब धोकादायक आहेत. हे खांब हटविण्यासाठी शहरातील वीज ग्राहकांनी २०११ ते २०१४ दरम्यान प्रत्येक युनिट मागे ९ पैसे दिलेले आहेत. परंतु आर्थिक परिस्थिती खालावल्याने मनपाला खांब हटविण्यासाठी पैसे उपलब्ध करू शकले नाही. दुसरीकडे वीज वितरण कंपनी महावितरणने आपले हात झटकले आहे. परिणामी शहरातील वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.
नागपूर शहरात १०८७ वीज खांब धोकादायक
ठळक मुद्देअपघाताचा धोका : महावितरण-मनपा अधिकाऱ्यांची टाळाटाळ