रेल्वे स्थानकावर १.०७ लाखाची दारु पकडली ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:08 IST2021-09-24T04:08:41+5:302021-09-24T04:08:41+5:30

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने तेलंगाना स्पेशल रेल्वेगाडीतून १ लाख ७ हजार ८२० रुपये किमतीच्या दारुच्या १०५ बाटल्या जप्त ...

1.07 lakh liquor seized at railway station () | रेल्वे स्थानकावर १.०७ लाखाची दारु पकडली ()

रेल्वे स्थानकावर १.०७ लाखाची दारु पकडली ()

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने तेलंगाना स्पेशल रेल्वेगाडीतून १ लाख ७ हजार ८२० रुपये किमतीच्या दारुच्या १०५ बाटल्या जप्त केल्या आहेत.

रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर ठाण्याचे निरीक्षक आर. एल. मीना यांना रेल्वेगाडी क्रमांक ०२७२४ नवी दिल्ली - हैदराबाद तेलंगाना स्पेशलमधून दारुची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ जवान ब्रिजेश कुमार, मुनेश गौतम, जसवीर सिंह, राजेश गडपलवार, विवेक कनोजिया, मणिशंकर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक केशव चौधरी, अर्शिल मिर्झा, उमेश सोनोने यांनी या गाडीची तपासणी केली असता, कोच क्रमांक एस ८ मध्ये दारुच्या सहा बॅग आढळल्या. या बॅगबाबत कोचमधील प्रवाशांकडे विचारणा केली असता, त्यावर कोणीच आपला हक्क सांगितला नाही. त्यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एका संशयित व्यक्तीला आरपीएफ ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता, त्याने आपले नाव श्रीनिवास एन. (३४, रा. मंचेरियाल, आंध्रप्रदेश) असे सांगितले. त्यानंतर आरोपी आणि जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.

...........

Web Title: 1.07 lakh liquor seized at railway station ()