शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोचमध्ये पाणी भरणारे १०५ कामगार बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:19 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या रेल्वेगाड्यात पाणी भरून उदरनिर्वाह करीत असलेल्या कामगारांवर अचानक उपासमारीची वेळ आली. कंत्राट नव्या ठेकेदाराला देण्यात आल्यामुळे त्याने जुन्या १०५ कामगारांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कामगारांनी या बाबीचा विरोध करून बुधवारी ‘डीआरएम’ कार्यालयासमोर निदर्शने केली.

ठळक मुद्दे‘डीआरएम’ कार्यालयासमोर निदर्शने : नव्या कंत्राटदाराने काढले कामावरून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या रेल्वेगाड्यात पाणी भरून उदरनिर्वाह करीत असलेल्या कामगारांवर अचानक उपासमारीची वेळ आली. कंत्राट नव्या ठेकेदाराला देण्यात आल्यामुळे त्याने जुन्या १०५ कामगारांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कामगारांनी या बाबीचा विरोध करून बुधवारी ‘डीआरएम’ कार्यालयासमोर निदर्शने केली. कामगारांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसमोर आपल्या समस्या मांडल्यानंतर त्यांना योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज १२५ रेल्वेगाड्यांचे आवागमन होते. यातील अनेक गाड्यांची नागपुरात देखभाल करण्यात येते. कोचमधील पाणी संपल्यामुळे प्रवाशांना प्रवासात बाथरुम, बेसिनमध्ये पाणी मिळावे यासाठी अनेकदा नागपुरात कोचमध्ये पाणी भरण्यात येते. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने हे काम खासगी ठेकेदाराला दिले आहे. वर्षभरापूर्वी १०५ मजुरांना कामावर ठेवले होते. त्यांना १३ हजार ५०० रुपये वेतन देण्यात येत होते. याशिवाय पीएफ आणि ईएसआयसीची सुविधा मिळत होती. सर्व काही सुरळीत सुरु असताना नवे टेंडर काढण्यात आले आणि या कामाचे कंत्राट नव्या ठेकेदाराला देण्यात आले. कामगारांच्या मते नव्या ठेकेदाराने त्यांना कमी पैशात काम करण्यास सांगितले. सोबतच पीएफ आणि ईएसआयसीची सुविधाही देण्यात येणार नसल्याचे सांगितले. अटी मंजूर नसल्यास काम सोडण्याची ताकीद त्यांना देण्यात आली. कामगारांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले. अशा स्थितीत कामगारांसमोर उपासमारीची वेळ आली. बुधवारी १०५ कामगारांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोर शांतीपूर्ण मार्गाने निदर्शने करून विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसमोर आपली समस्या मांडली. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी कामगारांना ठेकेदाराशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :railwayरेल्वेagitationआंदोलन