शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सकाळचे १०.४५ वाजूनही ओपीडीला डॉक्टरांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:40 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) वेळ सकाळी ८ वाजतापासूनची असताना औषधवैद्यकशास्त्र विभागात १०.४५ वाजूनही एकही वरिष्ठ डॉक्टर नव्हते. ज्यांना रुग्ण कौशल्याबाबत ज्ञान नाही ते ‘जेआर १’, ‘जेआर २’ रुग्णसेवा देत असल्याची धक्कादायक बाब वैद्यकीय शिक्षण विभागाचे (डीएमईआर) सहायक संचालन डॉ. तात्याराव लहाने यांच्या आकस्मिक भेटीदरम्यान समोर आली.

ठळक मुद्देडॉ. लहाने यांच्याकडून मेडिकलची झाडाझडतीउशिरा येणाऱ्या डॉक्टरांना दिला अल्टीमेटम५० व्हेंटिलेटरसाठी करणार प्रयत्न : सफाईच्या दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) वेळ सकाळी ८ वाजतापासूनची असताना औषधवैद्यकशास्त्र विभागात १०.४५ वाजूनही एकही वरिष्ठ डॉक्टर नव्हते. ज्यांना रुग्ण कौशल्याबाबत ज्ञान नाही ते ‘जेआर १’, ‘जेआर २’ रुग्णसेवा देत असल्याची धक्कादायक बाब वैद्यकीय शिक्षण विभागाचे (डीएमईआर) सहायक संचालन डॉ. तात्याराव लहाने यांच्या आकस्मिक भेटीदरम्यान समोर आली. असाच प्रकार मायक्रोबॉयलॉजी विभाग व मध्यवर्ती प्रयोगशाळेत त्यांना आढळून आला. या भेटीनंतर त्यांनी घेतलेल्या ‘कॉलेज कौन्सिल’मध्ये चांगलीच कानउघाडणी केली. पुन्हा असा प्रकार दिसून आल्यास कारवाई होईल, असा इशाराही दिला.वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यभरातील मेडिकलमधील अद्यावत सोर्इंना घेऊन डॉ. तात्याराव लहाने यांच्या नावाची समिती स्थापन केली. त्यांच्याकडे याचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी दिली. याला घेऊन डॉ. लहाने यांनी नागपूरच्या मेडिकलला भेट दिली. परंतु या पहिल्याच भेटीत मेडिकलचे काही विभाग उघडे पडल्याने खळबळ उडाली.सकाळी ८ वाजताच पोहचले डॉ. लहानेसकाळी ८ वाजता डॉ. लहाने मेडिकलच्या ओपीडीमध्ये दाखल झाले. सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असल्याने रुग्णांची गर्दी होती, परंतु औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) विभागात एकही वरिष्ठ डॉक्टर नव्हते. ‘जेआर १’, जेआर २’ रुग्णसेवा देत असल्याचे पाहून त्यांनी याला गंभीरतेने घेतले. इतर भागाची पाहणी करून १०.४५ वाजता पुन्हा ‘मेडिसीन’ विभागात आल्यावर त्यावेळेपर्यंत एकही वरिष्ठ डॉक्टर पोहचले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले. अशीच स्थिती मायक्रोबॉयलॉजी विभागाची होती. केंद्रीय प्रयोगशाळेत एकही मायक्रोबॉयलॉजी तज्ज्ञ उपस्थित नसल्याने डॉ. लहाने यांनी यालाही गंभीरतेने घेतले.स्त्रीरोग, अस्थिव्यंगरोग, शल्यचिकित्सा विभागाचे केले कौतुकडॉ. लहाने यांनी मेडिसीन विभागानंतर स्त्रीरोग व प्रसूती विभाग, अस्थिव्यंगरोग विभाग व शल्यचिकित्सा विभागाच्या ‘ओपीडी’ला भेट दिली. येथील रुग्णांची गर्दी आणि वरिष्ठ डॉक्टर स्वत: रुग्ण तपासणी करीत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.‘ट्रॉमा’ व ‘सुपर’लाही दिली भेटमेडिकलमधील ‘ओटी एफ’, बालरोग विभागाचे ‘एनआयसीयू’ ‘पीआयसीयू’ची पाहणी करून ट्रॉमा केअर सेंटरला भेट दिली. या दोन्ही अतिदक्षता विभागासह ‘ट्रॉमा’मध्ये व्हेंटिलेटरची गरज ओळखून प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या. साधारण ५० व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना डॉ. लहाने म्हणाले. यावेळी त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटललाही भेट दिली.डॉ. लहाने यांनी टीबी वॉर्डाला भेट दिली. यावेळी परिसरात वाढलेली झुडुपे, कचºयाचे व बांधकाम साहित्याचे ढिगारे पाहून आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी अधिष्ठात्यांना तातडीने याची सफाई करण्याचा सूचना दिल्या.त्याच दिवशी चाचणी, त्याच दिवशी उपचारडॉ. लहाने यांनी काही रुग्णांशी चर्चा केली. यात त्यांना सोमवारी रुग्णाची चाचणी झाल्यास त्याला अहवाल घेऊन पुढील सोमवारी बोलाविले जात असल्याचे आढळून आले. त्यांनी अधिष्ठात्यांना त्याच दिवशी चाचणी व त्याच दिवशी उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.अध्यापन व रुग्णसेवेला गंभीरतेने घ्याडॉ. लहाने यांनी मेडिकलच्या पाहणीनंतर कॉलेज कौन्सिल घेतली. यावेळी उपस्थित विभाग प्रमुखांना अध्यापन व रुग्णसेवेला गंभीरतेने घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच काही विभाग विकासाच्या मार्गावर असल्याचे सांगून जे विभाग अजूनही मागे आहेत त्यांनी त्या दृष्टीने पावले उचलण्याचे निर्देशही दिले. तसेच वेळेवर उपस्थित न राहण्याचा प्रकार पुढील भेटीत आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.अहवाल सादर करणारराज्यातील मेडिकलमधील रुग्णसेवेला घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्या अनुषंगाने सोमवारी मेडिकलची पाहणी केली. याशिवाय, राज्यभरातील १६ मेडिकलमधील बांधकामाला घेऊनही स्थापन केलेल्या समितीचा सचिव म्हणूनही भेट देण्यात आली. या पाहणीचा अहवाल लवकरच सरकारकडे सादर केला जाईल.डॉ. तात्याराव लहानेसहायक संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयdoctorडॉक्टर