दपूम रेल्वेत एकाच दिवशी १००२३ वॅगनची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:08 IST2021-02-27T04:08:55+5:302021-02-27T04:08:55+5:30
नागपूर : कोरोनाच्या काळात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनने आपल्या तिन्ही विभाग नागपूर, बिलासपूर आणि रायपूरच्या मदतीने २४ फेब्रुवारीला ...

दपूम रेल्वेत एकाच दिवशी १००२३ वॅगनची वाहतूक
नागपूर : कोरोनाच्या काळात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनने आपल्या तिन्ही विभाग नागपूर, बिलासपूर आणि रायपूरच्या मदतीने २४ फेब्रुवारीला एकाच दिवशी १००२३ वॅगनची वाहतूक करून एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. त्यानुसार कोळसा, क्लिंकर, लोखंड, सिमेंट, स्टील, खाद्यपदार्थ, रासायनिक उत्पादने, खनिज तेल, स्टील कारखान्यातील कच्चा माल आदींची वाहतूक करण्यात आली. दपूम रेल्वेचे महाव्यवस्थापक गौतम बॅनर्जी यांनी या उपलब्धीबद्दल झोनमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन यापुढेही चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. कोरोनाच्या काळात देशातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक वस्तुंची वाहतूक आणि विजेसाठी कोळसा पुरवठा करून दपूम रेल्वेने आपली जबाबदारी पार पाडली. या माध्यमातून विभागाने आपले उत्पन्नही वाढविले आहे. दपूम रेल्वेच्या नागपूर, बिलासपूर आणि रायपूर विभागाने सर्वाधिक माल वाहतूक करण्याचा रेकॉर्ड बनविण्यासाठी यश मिळविले आहे.