शंभर नंबरी निकाल
By Admin | Updated: May 20, 2014 01:14 IST2014-05-20T01:14:32+5:302014-05-20T01:14:32+5:30
सीबीएसईच्या दहावीच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच शाळांनीदेखील घवघवीत यश मिळवले आहे. नागपूर विभागातील बहुतांश शाळांनी तर शंभर नंबरी यश संपादित केले आहे.

शंभर नंबरी निकाल
प्रस्थापित शाळांच्या वर्चस्वाला धक्का
नागपूर : सीबीएसईच्या दहावीच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच शाळांनीदेखील घवघवीत यश मिळवले आहे. नागपूर विभागातील बहुतांश शाळांनी तर शंभर नंबरी यश संपादित केले आहे. त्यामुळे निकालानंतर सोमवारी शहरातील शाळांमध्ये सेलिब्रेशनचे वातावरण होते. दरम्यान, आतापर्यंत काही ठराविक शाळांनाच घवघवीत यश मिळत असल्याचे दिसून येत होते. परंतु यंदा तुलनेत नवीन असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांनी ‘टॉप’चा क्रमांक मिळवून दाखविला आहे. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे तर काही मोजक्या शाळांचा निकाल ७० ते ९५ टक्क्यांदरम्यान लागला आहे. निकाल उशिरा लागल्यामुळे अनेक शाळांमधील नेमकी टक्केवारी कळू शकली नाही. निकाल चांगला लागावा, यासाठी शाळांनी निरनिराळे प्रयोग राबविले होते. विद्यार्थ्यांकडे जास्तीतजास्त लक्ष देण्याचा त्यांनी प्रयत्न तर केलाच, मात्र टेस्ट सिरीज व जास्तीतजास्त सरावावरदेखील भर दिला होता. बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांचे ‘बेसिक’ पक्के करण्यावर भर टाकला होता. काही ठिकाणी तर दोन पेपरमधील सुट्टीच्या दिवसांमध्येदेखील विद्यार्थ्यांचा सराव घेण्यात आला. शाळांमधील स्पर्धा वाढली भवन्स विद्यामंदिर (सिव्हील लाईन्स), सेंटर पॉर्इंट शाळा (काटोल रोड) आणि मॉडर्न स्कूल (कोराडी रोड) यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या तिन्ही शाळांनी आपली परंपरा कायम राखत १०० टक्के निकाल दिला. परंतु सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी पहिले दोन क्रमांक मिळवीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. शिवाय फारशा नावाजलेल्या नसलेल्या शाळांचा निकालदेखील १०० टक्के लागल्याचे दिसून आले. स्पर्धेच्या युगात शाळांकडूनदेखील निकालाची टक्केवारी उंचावण्यासाठी निरनिराळ्या पद्धतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. उल्लेखनीय यश मिळविणार्या शाळा भवन्स विद्यामंदिर, सिव्हील लाईन्स भवन्स विद्यामंदिर, आष्टी सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूल सांदीपनी स्कूल, हजारीपहाड मॉन्टफोर्ट स्कूल स्वामी नारायणन् स्कूल, वर्धमाननगर सेंटर पॉर्इंट शाळा, काटोल रोड प्रेरणा पब्लिक स्कूल नारायण विद्यालयम्, वर्धा रोड जैन इंटरनॅशनल स्कूल भवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर मॉडर्न स्कूल, कोराडी संजुबा हायस्कूल स्कूल आॅफ स्कॉलर्स वंडरलॅन्ड हायस्कूल, कोराडी रोड सेंट झेव्हिअर्स स्कूल ललिथा पब्लिक स्कूल