उपराजधानीत १०० कोटींची वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:49 PM2018-05-25T12:49:55+5:302018-05-25T12:50:05+5:30

शीर्षक वाचून आश्चर्यचकित होऊ नका. ही वस्तुस्थिती आहे की शहरात गेल्या वर्षभरापासून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वीज चोरी झाली आहे.

100 Crore Electricity Stolen in second capital of state | उपराजधानीत १०० कोटींची वीज चोरी

उपराजधानीत १०० कोटींची वीज चोरी

Next
ठळक मुद्दे३७५१ प्रकरण उघडकीसचार्जशीट केवळ २४ वरझोपडपट्टी व दाट वस्तीत अधिक समस्या

कमल शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शीर्षक वाचून आश्चर्यचकित होऊ नका. ही वस्तुस्थिती आहे की शहरात गेल्या वर्षभरापासून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वीज चोरी झाली आहे. वीज वितरण कंपनी याविरुद्ध अनेक वर्षांपासून कारवाई करीत आहे. परंतु गेल्या २०११ पासून विचार केला असता वीज चोरीच्या एकूण ३७५१ प्रकरणांपैकी केवळ २४ प्रकरणातच आरोप पत्र दाखल होऊ शकले . त्यामुळे ही केवळ कागदी कारवाई असल्याचे दिसून येते.
शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएल कंपनी शहरात वीज पुरवठा करण्यासाठी दरवर्षी १६०० मिलियन युनिट (एमयू) वीज घेते. एक एमयूमध्ये १० लाख युनिट असतात. एसएनडीएलनुसार यापैकी १५ टक्के वीज वाया जाते. ७.५ टक्के तांत्रिक (वितरण प्रणाली) हानी होते. तर उर्वरित ७.५ टके वाणिज्यिक हानी असते. या वाणिज्यिक हानीचे सर्वात मोठे कारण वीज चोरीच आहे. युनिटचा विचार केला तर वर्षभरात यामुळे १२५ एम. यू. वीज वाया जात आहे. सध्या विजेचे एक युनिट (इंधन समायोजन व अन्य शुल्क धरून) जवळपास ८ रुपये इतके आहे. या हिशोबाने वर्षभरात १०० कोटी रुपयाची वीज चोरी होत आहे. दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर एसएनडीएल आपल्या क्षेत्रात वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणकडून वीज घेते. कंपनीनुसार त्याचे वर्षभराचे वीज बिल एक हजार कोटी रुपयांच्या जवळपास असते. वीज पुरवठा केल्यानंतर कंपनी नागरिकांकडून इलेक्ट्रीसिटी ड्युटी बिल घेते. एकूण व्यवसाय १५०० कोटीच्यावर जातो. यात ७.५ टक्के नुकसान जवळपास १०० कोटी रुपये येतो, असा एसएनडीएलचा दावा आहे. एसएनडीएलने शहरात वीज पुरवठा करणाऱ्या ११ केव्ही फिडरचे आॅडिट करून वीज चोरीसाठी कुख्यात असलेले परिसर नोंदवून ठेवले आहे. यात सर्वात वर ताजबाग फीडरचा क्रमांक येतो. या ठिकाणी ८७ टक्के विजेचे नुकसान दर्शविण्यात आलेले आहे.

कशी होत आहे वीज चोरी
वीज लाईन मीटरपर्यंत येण्यापूर्वीच त्याला वेगळे करून कनेक्शन जोडले जात आहे.
मीटरची छेडछाड करून रिमोटद्वारे संचालित करून
वीज मीटरची आयसी खराब करून
विजेच्या लाईनवर आकडे टाकून
मीटरचा डिस्प्ले खराब करून
अनेक भगात तर मीटर जाळण्यात आले आहे
ट्रान्सफार्मरमधून थेट कनेक्शन घेऊन

Web Title: 100 Crore Electricity Stolen in second capital of state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.