१०० ब्रास रेतीसाठा जप्त

By Admin | Updated: September 25, 2016 03:23 IST2016-09-25T03:23:21+5:302016-09-25T03:23:21+5:30

पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईमध्ये खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

100 brass sandstones seized | १०० ब्रास रेतीसाठा जप्त

१०० ब्रास रेतीसाठा जप्त

खापरखेडा : पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईमध्ये खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चनकापूर येथील शिवाजीनगरातून १०० ब्रास रेतीसाठा जप्त केला. या रेतीची किंमत अंदाजे एक लाख रुपये आकारण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
कृष्णा यादव, रा. चनकापूर याने मोठ्या प्रमाणात रेती साठवून ठेवल्याची तक्रार तहसीलदार राजू रणवीर यांच्याकडे केली होती. खापा येथील मंडळ अधिकारी पवार यांनी या भागाची पाहणी केली असता, त्यांना तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे शनिवारी सायंकाळी महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत या रेतीसााठ्याची चौकशी केली. यात यादव याच्याकडे रेतीची उचल करण्याची रॉयल्टी अथवा ती साठवून ठेवण्याची परवानगी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे तूर्तास हा रेतीसाठा जप्त करण्यात आला. हा साठा तलाठी मोरे यांच्याकडे सुपूर्दनाम्यावर ठेवण्यात आला. ही रेती दंडात्मक कारवाई करून सोडून द्यायची की सरकारजमा करायची, याबाबत निर्णय व्हायचा आहे. त्यामुळे सेपूर्ण रेतीसाठा उचलून खापरखेडा पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आला. ही प्रक्रिया सायंकाळी ६.४५ वाजेपर्यंत सुरू होती. दरम्यान, महसूल विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी दहेगाव (रंगारी) मार्गावर पिपळा (डाकबंगला)च्या दिशेने जाणारा एमएच-४०/वाय-३९७६ क्रमांकाचा ट्रक अडविला. अधिकाऱ्यांना पाहताच चालकाने ट्रक थांबवून पळ काढला. या ट्रकमध्ये दोन ब्रास रेती असल्याचे निदर्शनास आल्याने ही रेती व ट्रक पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: 100 brass sandstones seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.