शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दबाव व पैशाच्या जोरावर निकालाआधीच भाजपचे १०० नगरसेवक बिनविरोध ; सुजात आंबेडकर यांचा आरोप

By आनंद डेकाटे | Updated: December 1, 2025 16:00 IST

सुजात आंबेडकर यांचा आरोप : आरएसएस ही अनोंदणीकृत दहशतवादी संघटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांवर दबाव टाकून किंवा त्यांना पैशाचे आमीष देऊन मतदानापूर्वीच भाजपचे त्यांचे १०० नगरसेवक हे बिनविराेध निवडून आणले, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी येथे केला. ते सोमवारी नागपुरात पत्रपरिषदेत बोलत होते.

सुजात आंबेडकर म्हणाले, नगरपरिषद व नगर पंचायतच्या निवडणुका सुरू आहेत. परंतु दोन आठवड्यापूर्वीच भजपचे १०० नगरसेवक निवडून कसे येतात? हे लोकशाहीसाठी घातक आहे. भाजपने या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर केला. सर्वसामान्यांसाठी ही निवडणूक राहिलीच नाही. पैशासोबतच दबाब तसेच संपूर्ण यंत्रणेचा वापर केला. जो पैसा खर्च करेल किंवा भाजपला साथ देईल, तोच उमेदवार निवडणूक लढवू शकेल. एखादा सामान्य माणूस निवडणुकीत उतरलाच तर तो टिकणार नाही, अशी व्यवस्थाच भाजपने निर्माण केली आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे,असे ते म्हणाले.

आरएसएस ही अनोंदणीकृत दहशतवादी संघटना असल्याची टीका करीत सुजाात आंबेडकर यांनी पुन्हा एकदा आरएसएसवर प्रहार केला. ते म्हणाले छत्रपती संभाजीनगर येथील आरएसएस कार्यालयावर वंचितने मोर्चा काढला. तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी भारताचे संविधान, भाराताचा राष्ट्रीय ध्वज आणि महाराष्ट्र पब्लिक रजिस्ट्रेशन ॲक्ट या तीन गोष्टी घेऊन गेलो होतो. परंतु या तिन्ही गोष्टी आरएसएसने स्वीकारल्या नाहीत. याचाच अर्थ त्यांना भारताचे संविधान मान्य नाही. भारताचा झेंडा मान्य नाही तसेच ती संघटना नोंदणीकृत नाही. त्यामुळे या तिन्ही गोष्टी जोपर्यंत आरएसएस मान्य करीत नाही, तोपर्यंत त्यांच्याविरोधातील लढा सुरूच राहील. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे म्हणतात भारताची ओळख ही हिंदू धर्म आहे. परंतु भारताची ओळख ही हिंदू नसून भारतीय व भारताचे लोक आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नांदेडमध्ये काॅँग्रेसने पुन्हा एकदा धोकेबाजी केली

वंचित बहुजन आघाडीने नांदेडमध्ये काॅंग्रेससोबत युती करून मैत्रीचा हात पुढे केला होता. परंतु काॅंग्रेसने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा वंचितसोबत धोकेबाजी केल्याचे सांगत सुजात आंबेडकर यांनी बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर हे काॅंग्रेससोबत युती का करीत नाहीत? ते नांदेडच्या उदाहरणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचे सांगितले. अकोलामध्येही धोकेबाजी सातत्याने दिसून येते,असेही ते म्हणाले.

टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकBJPभाजपाNagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणुक 2022nagpurनागपूरNandedनांदेडRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ