शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’वर १० हजाराचा दंड; बहुचर्चित मोटार वाहन विधेयकाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 11:54 AM

आता वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट अधिक दंड, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईची तरतूद असणारे बहुचर्चित मोटार वाहन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. लवकरच हे विधेयक राज्यात लागू होणार आहे.

ठळक मुद्दे रस्ता सुरक्षेमध्ये आमूलाग्र बदलाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आता वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट अधिक दंड, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईची तरतूद असणारे बहुचर्चित मोटार वाहन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. लवकरच हे विधेयक राज्यात लागू होणार आहे. या नव्या विधेयकात मद्यपान करून वाहन चालविल्यास १० हजार रुपये दंड, वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास पाच हजार रुपये दंड, धोकादायक वाहन चालविल्यास पाच हजार रुपये दंड, परवाना नसताना वाहन चालविल्यास पाच हजार रुपये दंड केला जाणार आहे. यामुळे वाहतुकीचे नियम पाळले जाऊन अपघात कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.देशात ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे होतात. हे टाळण्यासाठी व बेशिस्त वाहनचालकांना चाप बसावा, या उद्देशाने मोटार वाहन विधेयकात अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सातत्याने या सुधारित मोटार वाहन विधेयकासाठी प्रयत्न चालविले होते. अखेर हे विधेयक संसदेत बुधवारी मंजूर झाले. यामुळे रस्ता सुरक्षेमध्ये आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. सोबतच वाहनांचे परवाने काढणे, त्यांची मुदत वाढवणे, वाहनांची नोंदणी यासारखी महत्त्वाची कामे आॅनलाईन पद्धतीने केली जाणार आहेत.

अल्पवयीन मुलाचा हातून अपघात झाल्यास पालकांना तुरुंगवासअल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास सध्या केवळ ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. परंतु नव्या विधेयकात अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळून आल्यास थेट गाडीची नोंदणी रद्द होणार आहे. याशिवाय अल्पवयीन मुलाच्या हातून अपघात झाल्यास पालकांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. सध्याच्या कायद्यात ही तरतूद नव्हती.

परवान्यासाठी शिक्षणाची अट रद्दपरवाना मिळविण्यासाठी पूर्वी आठवा वर्ग उत्तीर्ण असणे बंधनकारक होते. मात्र नव्या विधेयकात ही अटच काढून टाकण्यात आली आहे. यामुळे ड्रायव्हिंग स्कूलमधून मिळवलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे वाहनचालक परवाना मिळवता येईल. शिवाय, परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आता एक वर्षांची मुदत दिली जाणार आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा