एटीएमद्वारे १० हजार रुपये लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST2021-02-06T04:13:05+5:302021-02-06T04:13:05+5:30
कन्हान : अज्ञात आराेपीने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून एकाची फसवणूक केली शिवाय, आराेपीने एटीएमद्वारे १० हजार रुपये लंपास केले. ...

एटीएमद्वारे १० हजार रुपये लंपास
कन्हान : अज्ञात आराेपीने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून एकाची फसवणूक केली शिवाय, आराेपीने एटीएमद्वारे १० हजार रुपये लंपास केले. ही घटना कन्हान येथे मंगळवारी (दि.२) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
मदन विश्वनाथ सिंग (७०, रा. वाॅर्ड क्र.४, पिपरी कन्हान) यांचे स्टेट बॅंक ऑफ इंडिया कन्हान शाखेत खाते असून, ते एटीएममधून पैसे काढण्याकरिता गेले हाेते. एटीएममधून पैसे न निघाल्याने त्यांच्या मागे उभा असलेल्या अज्ञात व्यक्तीने सिंग यांचे एटीएम कार्ड मशीनमधून काढून दिले. यादरम्यान अज्ञात आराेपीने एटीएम कार्डची अदलाबदली करत सिंग यांच्या खात्यातून १० हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास पाेलीस हवालदार खुशाल रामटेके करत आहेत.