१० हजाराचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST2021-03-14T04:09:14+5:302021-03-14T04:09:14+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : नगर परिषद प्रशासनाने शहरात मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याची माेहीम सुरू केली ...

१० हजाराचा दंड वसूल
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : नगर परिषद प्रशासनाने शहरात मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याची माेहीम सुरू केली आहे. या माेहिमेंतर्गत पहिल्याच दिवशी (शनिवार, दि. १२) ५० जणांकडून पाच हजार रुपये तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका फायनान्स कंपनीकडून पाच हजार रुपये असा एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती तहसीलदार तथा पालिकचे प्रभारी मुख्याधिकारी अजच चरडे यांनी दिली.
दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमण हळूहळू वाढत असून, नागरिकांचा बेजबाबदारपणा कायम आहे. वारंवार सूचना देऊनही नागरिक काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करीत नसल्याने दंडात्मक कारवाईची माेहीम हाती घेण्यात आली, अशी माहिती अजय चरडे यांनी दिली. प्रत्येकाने घराबाहेर पडता मास्क वापरणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पालिकेच्या पथकाने शहरातील मुख्य व इतर मार्गासह विविध भागात फेरफटका मारला. यात त्यांनी मास्क न वापरणाऱ्या ५० जणांवर प्रत्येकी १०० रुपयांचा दंड ठाेठावत ताे वसूल केला. शनिवार व रविवारी दुकानांसह व्यापारी प्रतिष्ठाने व कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले हाेते. मात्र, बेरार फायनान्स कंपनीचे कार्यालय सुरू असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे या कंपनीवरही पाच हजार रुपयांचा दंड ठाेठावत ताे वसूल करण्यात आला.
ही माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार तथा पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी अजय चरडे यांच्या नेतृत्वातील पथकात पालिका प्रशासनाचे कार्यालय अधीक्षक संदीप वाघमारे, उपमुख्याधिकारी विजयकुमार आत्राम, अविनाश बरसे, अरविंद गजभिये, करण घिचेरिया, अजय आगे, विनोद सातपुते, चंद्रशेखर सावरकर, प्रवीण पांडे, भास्कर काळमेघ, राजू धवड, भास्कर बाभूळकर यांचा समावेश हाेता.