अंजली घोडवैद्य हिचे १० आॅक्टोबरला अरंगेत्रम
By Admin | Updated: October 6, 2015 04:08 IST2015-10-06T04:08:43+5:302015-10-06T04:08:43+5:30
नागपूरची शास्त्रीय नृत्यांगणा अंजली विवेक घोडवैद्य हिचे १० आॅक्टोबरला अरंगेत्रमचे सादरीकरण होणार आहे. सिव्हिल

अंजली घोडवैद्य हिचे १० आॅक्टोबरला अरंगेत्रम
नागपूर : नागपूरची शास्त्रीय नृत्यांगणा अंजली विवेक घोडवैद्य हिचे १० आॅक्टोबरला अरंगेत्रमचे सादरीकरण होणार आहे. सिव्हिल लाईन येथील वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा उपस्थित राहणार असल्याची माहिती अंजली घोडवैद्य हिने सोमवारी पत्रपरिषदेत दिली. अंजली गुरुरत्नम जनार्दनन यांची शिष्या आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून अंजली शास्त्रीय नृत्याचे धडे घेत आहे. भरतनाट्यम् नृत्य प्रकारातील अरंगेत्रम हे नृत्यांगणेच्या करिअरमध्ये मोठे यश समजले जाते. या कार्यक्रमादरम्यान ती भरतनाट्यम्मधील ‘मार्गम’चे पारंपरिक सादरीकरण व आठ वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य सादर करणार आहे. अंजली ही लोकमतचे वरिष्ठ कार्मिक व्यवस्थापक विवेक घोडवैद्य यांची कन्या आहे.