१० लाखांचा ऐवज जप्त
By Admin | Updated: August 11, 2016 02:24 IST2016-08-11T02:24:50+5:302016-08-11T02:24:50+5:30
पोलिसांनी सतरापूर शिवार व कन्हान-चाचेर मार्गावरील पुलाजवळ केलेल्या दोन वेगावेगळ्या कारवाईमध्ये शिवारात

१० लाखांचा ऐवज जप्त
अवैध वाहतूक : १९ जनावरांची सुटका
कन्हान : पोलिसांनी सतरापूर शिवार व कन्हान-चाचेर मार्गावरील पुलाजवळ केलेल्या दोन वेगावेगळ्या कारवाईमध्ये शिवारात केलेल्या कारवाईमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले. यात एकूण १९ जनावरांची सुटका करून आरोपींना अटक केली. या दोन्ही कारवार्इंमध्ये एकूण १० लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कन्हान-चाचेर मार्गावरून जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी या मार्गावरील पुलाजवळ रविवारी सकाळी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली.
दरम्यान, एमएच-४९/डी-३२८४ क्रमांकाचा ट्रक अडवून त्याची तपासणी केली असता, त्यात १० गाई कोंबल्या असल्याने निदर्शनास आले. या गुरांची वाहतूक अवैध असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सर्व जनावरे ताब्यात घेत वाहन जप्त केले आणि वाहनचालकास अटक केली.
या कारवाईमध्ये तौसिफ इब्राहीम कुरेशी (३०, रा. भाजीमंडी, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ८८ हजार रुपये किमतीची जनावरे तसेच पाच लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ५ लाख ८८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दुसरी कारवाई सतरापूर शिवारात शुक्रवारी मध्यरात्री करण्यात आली. यात पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली असता, एमएच-३५/के-४१०२ क्रमांकाच्या मालवाहू बोलेरोमध्ये नऊ जनावरे कोंबली असल्याचे आढळून आले. ही सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट होताच पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका करून वाहनचालकास अटक केली. नौशाद वल्द मोहम्मद पठाण (२४, रा. कादर झेंडा, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ४३ हजार रुपये किमतीचा जनावरे आणि चार लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ४ लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या सर्व जनावरांना नजीकच्या गो शाळेत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी जनावरांना निर्दयतेने वागविण्याबाबतचा कायदा कलम ११ (अ) (ड) (इ) (फ) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ सहकमल ५ (अ), १, २, ९ अन्वये गुन्हा नोंदविला असून, या दोन्ही घटनांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय पोटे करीत आहेत. (प्रतिनिधी)