लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लकडगंज येथील शिवशाही बसच्या वर्कशॉपमधून चोरट्यांनी १० लाख रुपयाच्या वस्तू चोरून नेल्या. स्माल फॅक्टरी एरिया येथे शिवशाही बसचे वर्कशॉप आहे. लॉकडाऊनमुळे २४ मार्चपासून वर्कशॉप बंद होते. यादरम्यान अज्ञात आरोपींनी टिनाचे गेट तोडून आत प्रवेश केला. वर्कशॉपमध्ये ठेवलेल्या १० लाख रुपयाच्या वस्तू चोरून नेल्या. २१ जुलै रोजी वर्कशॉपचा कर्मचारी अभिलाष मालवीय तिथे आला. तेव्हा त्याला चोरी झाल्याचे माहिती पडले. त्याने वर्कशॉपचे मॅनेजर अक्षय खराबे यांना सूचना दिली. खराबे यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून विचारपूस सुरू आहे.
शिवशाही बसच्या वर्कशॉपमधून १० लाखाच्या वस्तू चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 20:33 IST