शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात १० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 20:11 IST

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यात तब्बल १०,२६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ही प्राथमिक माहिती असून पंचनामे अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे पंचनामे सुरुच, गहू, हरबराचे सर्वाधिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यात तब्बल १०,२६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ही प्राथमिक माहिती असून पंचनामे अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.चार दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस व मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. विदर्भासह नागपूर जिल्हाही यातून सुटला नाही. गारपिटीमुळे काटोल, नरखेड, रामटेक, मौदासह जिल्ह्यातील अनेक गावांना फटका बसला. जवळपास १०,२६० हेक्टरवरील गहू, हरभरा आदि पिकांसह संत्रा,मोसंबी, केळी, आंबा ,आदि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास २७६ गावांमधील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यात ११ तारखेला झालेल्या अवकाळी पावसात केवळ मौदा आणि नागपूर ग्रामीण भागालाच फटका बसला होता. तेव्हा जवळपास २०९५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. परंतु १२ तारखेला पुन्हा गारपीट झाली. तेव्हा नरखेड, काटोल, रामटेक आदी भागाला चांगलाच फटका बसला जवळपास ८२०० हेक्टरवरील पिकांना नुकसान झाले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. तेव्हा २४ तासात पंचनामे सादर करून प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कृषी व महसूल विभागाचे अधिकारी बुधवारी सकाळपासूनच फिरत आहेत. पंचनामे करीत आहेत. सायंकाळपर्यंत झालेल्या पाहणीनुसार १० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती होती. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर