१० लाखांची पुस्तके जप्त
By Admin | Updated: August 7, 2014 00:59 IST2014-08-07T00:59:50+5:302014-08-07T00:59:50+5:30
व्यावसायिक अभ्यासक्रमांची बनावट पुस्तके विकली जात असल्याच्या तक्रारीवरून गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने आज सहा पुस्तक विक्रेत्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध

१० लाखांची पुस्तके जप्त
विक्रेत्यांवर गुन्हेशाखेची कारवाई : व्यावसायिक अभ्यासक्रमांची बनावट पुस्तके
नागपूर : व्यावसायिक अभ्यासक्रमांची बनावट पुस्तके विकली जात असल्याच्या तक्रारीवरून गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने आज सहा पुस्तक विक्रेत्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची सुमारे दीड हजार पुस्तके जप्त केली.
साईकृष्णा असोसिएट नवी दिल्ली येथून आलेले राजेश मिश्रा यांनी मेडिकल, इंजिनिअरिंगसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची बनावट पुस्तके (पायरेटेड बुक्स) मॉरिस कॉलेज टी पॉर्इंट जवळ विकली जात असल्याची तक्रार गुन्हेशाखेत नोंदवली. गुन्हेशाखेचे उपायुक्त सुनील कोल्हे यांनी या तक्रारीची दखल घेत लगेच कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, एसीपी नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, एपीआय सोनाली पाटील, एपीआय अमिता जयपूरकर, पीएसआय कोहळे एएसआय रामानंद ठाकूर, सुरेश पंघरे, हवालदार सुभाष, घनश्याम, नायक गोपाल, संजय पांडे यांनी आज दुपारी १ वाजता मॉरिस कॉलेज टी पॉईट (पटवर्धन शाळेचे बाजूला) पुस्तके विकणाऱ्यांवर छापा घातला. यावेळी सुनील पाटील (रा. भीमनगर), हरीश वाहाने (रा. बाळाभाऊ पेठ), दिगंबर तितरमारे (रा. हजारीपहाड), अविनाश पाटील (रा़ भानखेडा), निकेश फुलझले (रा. बाळाभाऊपेठ) आणि अमरनाथ मेश्राम (रा. जयभीमनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून व्यावसायिक अभ्यासक्रमाची बनावट (छापलेली) सुमारे १५०० पुस्तके जप्त करण्यात आली. त्याची किंमत अंदाजे १० लाख रुपये असल्याचे पोलीस सांगतात. (प्रतिनिधी)