१० वन अधिकाऱ्यांच्या बदल्या

By Admin | Updated: March 27, 2015 01:56 IST2015-03-27T01:56:56+5:302015-03-27T01:56:56+5:30

राज्य वन विभागातील १० वन अधिकाऱ्यांच्या (आयएफएस)पदोन्नती अंतर्गत विविध वन परिक्षेत्रांमध्ये बदली करण्यात आली आहे.

10 Forest Officers Transfer | १० वन अधिकाऱ्यांच्या बदल्या

१० वन अधिकाऱ्यांच्या बदल्या

नागपूर : राज्य वन विभागातील १० वन अधिकाऱ्यांच्या (आयएफएस)पदोन्नती अंतर्गत विविध वन परिक्षेत्रांमध्ये बदली करण्यात आली आहे.
वन मुख्यालय नागपूरतर्फे मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथील उपवनसंरक्षक ए.डी. भोसले यांना वन संरक्षक (कार्ययोजना) पदी बढती देऊन गडचिरोलीला पाठवण्यात आले आहे. त्याचप्रकारे जळगावचे उपवनसंरक्षक यू.जी. कडलग यांना वनसंरक्षक (कार्य योजना) यवतमाळ, धुळे येथील उपवनसंरक्षक एस.जी. चोपडे यांना संचालक वन अकादमी (चंद्रपूर), पांढरकवडाचे उपवनसंरक्षक ए.जी. गिऱ्हेपुंजे यांना उपवनसंरक्षकपदी पदोन्नती देऊन औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे.
यापूर्वी गिऱ्हेपुंजे हे नागपूर वन मुख्यालयात विभागीय वन अधिकारी म्हणून कार्यरत होते. यासोबतच भामरागडचे उपवनसंरक्षक एस.जी. हलमारे यांना जळगाव उपवनसंरक्षक, गोंदियाचे सहायक वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांना उपवनसंरक्षक पांढरकवडा, पेंचचे सहायक वनसंरक्षक चंद्रशेखर बाला एन. यांना उपवनसंरक्षक भामरागड, वडसाचे उपवनसंरक्षक एम. आदर्श रेड्डी यांना उपवनसंरक्षक धुळे, गडचिरोलीचे सहायक वनसंरक्षक टी. बेयुला एझिल माथी यांना वडसा उपवनसंरक्षक आणि डहाणूचे सहायक वनसंरक्षक बी.एन. पिंगळे यांना मेवासीचे उपवनसंरक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 10 Forest Officers Transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.