शहीद बडोले यांच्या कुटुंबीयांना १ कोटीची आर्थिक मदत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:08 IST2021-02-27T04:08:49+5:302021-02-27T04:08:49+5:30
नागपूर : जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले शहीद सहायक उपनिरीक्षक नरेश बडोले यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे १ ...

शहीद बडोले यांच्या कुटुंबीयांना १ कोटीची आर्थिक मदत ()
नागपूर : जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले शहीद सहायक उपनिरीक्षक नरेश बडोले यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते वीरपत्नी प्रमिला नरेश बडोले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच १ कोटी रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी शहीद नरेश बडोले यांच्या दोन मुलीही उपस्थित होत्या.
गेल्या वर्षी २४ सप्टेंबर रोजी नरेश बडोले हे आपल्या कंपनीसह श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाच्या सुरक्षेत तैनात हाेते. अचानक सुरू झालेल्या गोळीबारात त्यांना वीरमरण आले. तत्पूर्वी, हा हल्ला परतवताना त्यांनी आपल्या साहसाचे दर्शन घडविले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर शिल्पा खरपकर उपस्थित होते.
------------------