शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

नागपुरात प्लॉट विक्रीच्या नावावर एक कोटीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:51 IST

एका केबल चॅनलच्या संचालकाने प्लॉट विक्रीच्या नावावर एक कोटी रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजनी पोलिसांनी आरोपी सचिन जागोराव पाटील (४५) रा. दिनप्रजाहित सोसायटी नरेंद्र नगर याला अटक केली आहे.

ठळक मुद्देप्रॉपर्टी डीलरला अटक : अनेक नागरिक फसले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका केबल चॅनलच्या संचालकाने प्लॉट विक्रीच्या नावावर एक कोटी रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजनी पोलिसांनी आरोपी सचिन जागोराव पाटील (४५) रा. दिनप्रजाहित सोसायटी नरेंद्र नगर याला अटक केली आहे. शरदचंद्र श्रीपत (६९) रा. सोमलवाडा असे फिर्यादीचे नाव आहे.पाटील स्वत:ला एका केबल चॅनल्सचा संचालक असल्याचे सांगतो. त्याचा प्रॉपर्टी डीलिंग व डेव्हलपर्सचा व्यवसाय आहे. श्रीपत यांच्या तक्रारीनुसार २०१० मध्ये त्यांची पाटील यांच्याशी ओळख झाली. श्रीपत हे मडगाव पोर्ट ट्रस्ट येथून वरिष्ठ मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते. पाटील याने त्याचे बेलतरोडी येथे ले-आऊट असल्याचे सांगितले होते. माफक दरात प्लॉट विकले जात असल्याचे आमिष त्याने दाखवले. पाटील याने श्रीपत व त्यांच्या दोन नातेवाईकांसह अनेक लोकांसोबत प्लॉट विक्रीचा करार केला. गुंतवणूकदारांकडून रोख व धनदेशाद्वारे ७६ लाख २७ हजार रुपये घेतले. इतर गुंतवणूकदारांकडून २८ लाख २१ हजार रुपये घेतले. श्रीपत व इतर गुंतवणूकदारांनी ठरलेली रक्कम दिल्यानंतर रजिस्ट्री करून देण्याचे आश्वासन दिले होते. पैसे पूर्ण दिल्यामुळे गुंतवणूकदार रजिस्ट्रीसाठी पाटीलवर दबाब टाकत होते. परंतु तो टाळाटाळ करू लागला. अनेक दिवस लोटून रजिस्ट्री होत नसल्याने गुंतवणूकदारांना संशय आला. त्यांनी बेलतरोडी येथे जाऊन जमिनीची पाहणी केली. पाटीलने किमान पावणेदोन एकर जागेवर ले-आऊट बनविले होते. परंतु जमिनीची मालकी दुसºयाच्याच नाववर असल्याचे उघडकीस आले. गुंतवणूकदारांनी याबाबत पाटीलला विचारणा केली.पोलीस सूत्रानुसार पितळ उघडे पडल्यामुळे पाटील याने गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन शांत केले. पैसे परत केले जातील, या आश्वासनामुळे त्याने अनेक दिवसांपासून गुंतवणूकदारांना शांत करून ठेवले होते. परंतु तो पैसे परत करीत नसल्याचे लक्षात आल्यावर श्रीपत यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला व पाटीलला अटक केली. प्राथमिक चौकशीत श्रीपत यांच्यासह १५ लोकांनी पाटील याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पाटीलला गुरुवारी न्यायालयासमोर सादर करून पाच दिवसाची कोठडी घेतली आहे.पॉवर आॅफ अटर्नी बोगसपाटीलने ज्या जागेवर ले-आऊट बनवून प्लॉटची विक्री केली आहे त्या जमिनीच्या मूळ मालकाला या फसवणुकीबाबत माहीत नव्हते. पाटीलने चार लोकांकडून या जमिनीची पॉवर आॅफ अटर्नी मिळविली होती. ५०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तयार करण्यात आलेल्या या पॉवर आॅफ अटर्नीत चार लोकांचे पत्ते सुद्धा नोंदविलेले नाहीत. त्यामुळे ते बोगस असल्याचे आढळून आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर