३ बातम्या

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30

सेवालाल महाराजांची जयंती

3 news articles | ३ बातम्या

३ बातम्या

वालाल महाराजांची जयंती
औरंगाबाद : बंजारा समाजाचे आराध्य दैवत सद्गुरू सेवालाल महाराज यांची जयंती गोर सेनेच्या वतीने मोटारसायकल रॅली काढून साजरी करण्यात आली. या रॅलीत पैठण, खुलताबाद तालुक्यांतील वेगवेगळ्या तांड्यांवरील मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात देवळाई चौक येथून झाली. गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ राठोड, प्रवीण राठोड, रविकांत राठोड, जीवन चव्हाण, शिवाजी राठोड, नारायण राठोड, मधुकर पवार आदींनी परिश्रम घेतले.
-
केळकर समिती अहवालावर चर्चासत्र शुक्रवारी
औरंगाबाद : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेत २० व २१ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता केळकर समिती अहवालावर चर्चासत्र आयोजित केले आहे. चर्चासत्राचे उद्घाटन अर्थशास्त्रज्ञ श्रीनिवास खांदेवाले करतील. प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर किंमतकर, निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी आदींची उपस्थिती राहील. समारोप प्रा. दिनकर बोरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल.
-----
अजिंठ्याला सहल
औरंगाबाद : आदर्श मित्रमंडळातर्फे रिमांड होममधील विद्यार्थ्यांची सहल अजिंठा लेणी येथे नेण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष सुहास दाणी, सचिव सत्यविजय देशमुख, नरेंद्र तायडे, नीलेश पनजकर, प्रमोद देशमुख, रिमांड होमचे अधीक्षक जंगले,जगताप आदींनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
-

Web Title: 3 news articles