एक शिक्षिका मुलांना त्यांचा ग्रुप फोटो दाखवत होती..
शिक्षिका- जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा हा फोटो पाहून म्हणाल... हा पाहा राजू.. इंजिनीयर झाला.. अमेरिकेला गेलाय.. हा रवी.. डॉक्टर झाला.. लंडनला गेलाय..
सगळे विद्यार्थी ऐकत होते.. गण्याची थोडी चुळबुळ सुरू होती.. त्याच्याकडे कटाक्ष टाकत शिक्षिका म्हणाल्या..
शिक्षिका- आणि तुम्ही सगळे म्हणाल.. हा गण्या... इथेच राहिला...
गण्या- मॅडम आम्ही पण सांगू.. या आमच्या मॅडम.. देवाघरी गेल्या आहेत..