एक तरूण झोपताना लग्नाचा विचार करत होता...
सर्वसामान्य माणसं एक लग्न करतात.. मग आयुष्यभर ती भांडत बसते.. त्यापेक्षा मी दोन लग्न करतो.. म्हणजे त्या दोघी माझ्यासाठी भांडतील...
दोन बायका असल्यावर माझी मज्जाच मज्जा.. एक मारायला आलीच, तर दुसरी वाचवेल, असा विचार तरुणाच्या मनात सुरू होता.. विचारचक्र सुरू असताना त्याला झोप लागली..
पहाटे विचित्र स्वप्नानं त्याची झोपमोड झाली.. दोन बायका त्याच्याशीच भांडत होत्या... एकीनं त्याला धरून ठेवलं होतं.. तर दुसरी त्याला बुकलून काढत होती.. अगदी लाथाबुक्क्यांनी हाणत होती...आपलं भविष्य पाहून त्यानं दोन लग्नाचा विचार सोडला...