बायको- अहो मला एक सांगा.. जेव्हा आपलं लग्न नवीन होतं, तेव्हा मी स्वयंपाक करायचे.. आताही मीच करते म्हणा..
नवरा- मग..? मुद्द्यावर ये की...
बायको- लग्न नवीन असताना तुम्ही कमी जेवायचात आणि मला जास्त द्यायचात.. अगदी भरवायचात मला प्रेमाने...
नवरा- हो.. भरवायचो...
बायको- मग आता का नाही मला जास्त खाऊ घालत आणि स्वत: कमी खात...?
नवरा- कारण आता तुला चांगला स्वयंपाक जमू लागलाय.. आधी नाही जमायचा...