‘आप’लेच अपयश!
By Admin | Updated: March 23, 2015 19:59 IST2015-03-23T19:59:40+5:302015-03-23T19:59:40+5:30
दिल्लीत स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतरही ‘शुद्ध’ राजकारणाचा ‘आप’ला प्रयोग अंतर्गत अराजकामुळे टीकेचे लक्ष्य झालेला असताना डॉ. संग्राम पाटील यांनी केलेले हे ‘आप’-परीक्षण!

‘आप’लेच अपयश!
>डॉ. संग्राम पाटील
डॉ. संग्राम पाटील. ब्रिटनमधला वैद्यकीय व्यवसाय सोडून आपले कौशल्य ‘देशकारणी’ लावण्याच्या
उद्देशाने ‘परत मातृभूमीकडे’ आलेला ध्येयवादी कार्यकर्ता. जळगावजवळच्या एरंडोलमध्ये बस्तान बसवून विविध सामाजिक कामात सहभागी झालेल्या डॉ. पाटील यांनी ‘आप’तर्फे लोकसभेची निवडणूक लढवली. पराभव पाहिला. दिल्लीत स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतरही ‘शुद्ध’ राजकारणाचा ‘आप’ला प्रयोग
अंतर्गत अराजकामुळे टीकेचे लक्ष्य झालेला असताना डॉ. पाटील यांनी केलेले हे ‘आप’-परीक्षण!
-----------
अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून अरविंद केजरीवाल देशाला चांगलेच माहीत झाले. तत्पूर्वी त्यांचे काम दिल्लीकरांना परिचित होते. अण्णाआंदोलनात काही राजकीय पुढा:यांनी आंदोलनकत्र्याना राजकारणात येऊन बदल करण्याचे जे आवाहन केले त्यातून आम आदमी पार्टी (आप) नावाचा नवीन राजकीय पक्ष जन्माला आला. सुरुवातीला देशातील शुद्ध राजकारणात किंवा राजकीय शुद्धिकरणासाठी काम करू पाहणारे सगळेच कार्यकर्ते या पक्षाबद्दल आणि त्याच्या यशाबद्दल साशंक होते. दिल्लीतील जनतेचा आम आदमीला मिळणारा प्रतिसाद बघून देशभर कार्यकर्ते जुळू लागले. महाराष्ट्रात बरेच समाजवादी व भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते आम आदमी पार्टीमध्ये सहभागी झाले. आमच्यासारख्या राजकीय शुद्धिकरणासाठी प्रयत्नशील असलेल्या कार्यकत्र्याना आम आदमी पार्टी म्हणजे घरचाच मंच झाला. भारतीय राजकारणात एक अभूतपूर्व घटना घडत असल्याचे आम्ही अनुभवत होतो. यंत्रणा परिवर्तनाचे हे वादळ आता देशातील प्रस्थापित भ्रष्ट, जातीय आणि घराणोशाहीच्या राजकारणाला उखडून फेकणार असा आशावाद आम आदमी पार्टीने निर्माण केला. अशी परिस्थिती वर्तमान पिढीतील भारतीय तरुणांच्या आयुष्यात पूर्वी कधी आलेली नव्हती.
दिल्लीतील राजीनामा प्रकरणाआधी आम आदमी पार्टीकडे येणा:या लोकांची गर्दी सांभाळणो आम्हाला मुश्कील झाले होते. अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा सादर केला आणि प्रसारमाध्यमांनी त्यांच्या विरोधात टीकेचे वादळ उठविले. त्यानंतर लोकसभा निवडणुका देशाने अनुभवल्या. या निवडणुकांमध्ये प्रसारमाध्यमे आणि भांडवलशहा यांची जी भूमिका राहिली तेवढी सक्रिय भूमिका गेल्या 65 वर्षात कधीही देशाने पाहिली नव्हती. लोकसभा निवडणुकीतील एक उमेदवार म्हणून हे मी स्वत: अनुभवले आहे.
नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीकर जनतेने आम आदमी पार्टीला अनपेक्षित असे भव्य यश दिले.
त्यानंतरच्या घडामोडी मात्र काहीशा निराशादायी आहेत. पक्षातील प्रमुख नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या नावाने जे युद्ध ट्वीटर मीडियामध्ये सुरू झालेय त्यातून सामान्य आम आदमी कार्यकर्ता नाराज आहे. देशात पर्यायी राजकारणाचा शुद्ध मंच देऊ पाहणा:या आम आदमी पार्टीबद्दल लोकांच्या मनात शंका उपस्थित झाली आहे. काँग्रेस आणि प्रमुख काँग्रेस विरोधक पक्ष यांना देशात दीर्घकाळ टिकेल असा पर्याय उभा राहू शकत नाही का? अशी भावना जनतेत पसरू लागली आहे. किंबहुना असे वातावरण निर्माण केले जाते आहे. असे का होतेय? देशात शुद्ध व पर्यायी राजकारण करू पाहणारे मागे का राहताहेत याचा विचार व्हायला हवा.
आम आदमी पार्टीचे शिलेदार
आम आदमी पार्टीचे बहुतांश नेते हे त्यांच्या क्षेत्रतील अत्यंत कर्तृत्ववान कार्यकर्ते आहेत. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, मेधा पाटकर, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांसारखी मंडळी मूलत: त्यांच्या कार्यामुळे ओळखली जातात. आम आदमी पार्टी सोडून त्यांचे स्वत:चे वेगळे असे अस्तित्व आहे. पक्षाने त्यांना काही देण्यापेक्षा त्यांनीच पक्षाला मोठे योगदान दिले आहे. यातील बहुतांश मंडळी आपल्या तत्त्वाला, ध्येयाला धरून आयुष्य जगणारे आहेत. तत्त्वाच्या पलीकडे काही घडल्यास हे लोक तडजोड करण्यास तयार नाहीत. मूळ तत्त्वापासून पार्टी लांब जाऊ लागल्यास ही मंडळी आरडाओरडा सुरू करतात. ट्वीटरवर लिहितात, मीडियासमोर येऊन बोलतात. ‘पक्षातून हाकलल्यावर काय’ अशी भीती त्यांच्या मनात नाही. पक्षाने त्यांना दूर केल्यास या सर्वांचे स्वत:चे असे मोठे जग आहे, ज्यात ते स्वत:ला पूर्णपणो गुंतवून घेऊ शकतात. किंबहुना त्यांचे मुख्य काम हे त्यांच्या स्वत:च्या जगातच आहे. त्यामुळे कुणाची मर्जी सांभाळत बसणो त्यांना गरजेचे वाटत नसावे.
स्वत:चं अस्तित्व
बहुतांश आम आदमीच्या नेत्यांचे राजकारण हे उद्योग, व्यवसाय किंवा आपले समाजकारण वाढवावे किंवा टिकवून ठेवावे यासाठी नाही. आम आदमी पार्टीचा असे करण्याला सक्त विरोध आहे. त्यामुळे या मंडळींना आपल्या तत्त्वाने काम चालत नाहीये असे वाटले तर ते सरळ पार्टीला दोष देऊन बाहेर पडू शकतात. इतर प्रस्थापित पक्षांमधील नेत्यांचे ‘व्यावसायिक’ आणि ‘व्यक्तिगत’ आयुष्य पक्षातील त्यांच्या स्थानाशी निगडित असते. पक्ष सोडून त्यांचे फारसे स्वतंत्र अस्तित्व नसल्याने स्वत:च्या प्रगती व संरक्षणासाठी त्यांना राजकीय पाठबळ आवश्यक असते. आम आदमीच्या नेत्यांना असे कुठलेही संरक्षण लागत नाही. त्यामुळे त्यांना बांधून ठेवेल असा कुठला धागा नाही. अर्थात, देशाला पर्यायी राजकीय यंत्रणा देणो हे सगळ्यांचे उद्दिष्ट असले तरी ही मंडळी विचार व अस्तित्वाने स्वतंत्र असल्याने पक्षाला चिकटून राहणो त्यांना बंधनकारक वाटत नसावे.
चळवळकत्र्याचा इगो
अनेक दशकांच्या स्वकर्तृत्वाने उभारलेल्या कामामुळे अनेक सामाजिक कार्यकत्र्यामध्येही दुर्दैवाने इगो प्रॉब्लेम मोठय़ा प्रमाणावर दिसून येतो. हा इगो अनेकदा उफाळून येत राहतो. अनेक आंदोलने व चळवळकत्र्याचे आपसात पटत नाही याचे मुख्यत: हेच कारण असते. सद्यस्थितीला आम आदमी पार्टीमध्ये उद्भवलेल्या समस्येचे हे एक प्रमुख कारण दिसते. आम आदमी पार्टीने कुठे मोठी चूक केली आहे किंवा तत्त्व सोडले असे दिसत नाही. पण केंद्रीय समितीच्या सदस्यांचा सर्वस्तरीय अहंकार हा संपूर्ण पक्षाला त्रसदायक ठरताना दिसतो आहे.
प्रॅक्टिकल अडचणी
मी या पक्षाचा कार्यकर्ता आहे. या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढलो आहे. या कामात आम्हाला प्रत्यक्ष जाणवलेल्या काही अडचणी अशा. आम आदमी पक्षात आज हजारो कार्यकर्ते पडेल ते काम करायला तयार आहेत. सुरुवातीला जसे लोक आम आदमी पार्टीमध्ये घुसले त्यातील निम्म्याहून अधिक लोक हे संघवाले, संधीवाले आणि सेटिंगवाले होते. रा. स्व. संघाच्या राजकीय मंचावर आपले लोक घुसविण्याच्या आपल्या जुन्या कार्यक्रमानुसार अनेक संघ कार्यकर्ते शुद्ध राजकारणाची आवड असल्याच्या आविर्भावात आम आदमी पार्टीत सक्रि य झाले. ऐन निवडणुकीच्या वेळी या सगळ्यांनी आधीच कमकुवत असलेली आम आदमी पार्टीची यंत्रणा संपूर्ण मोडून काढली. अनेक संधिसाधू लोक केवळ तिकिटासाठी पार्टीत आले होते. त्यांचा भ्रमनिरास झाल्याने त्यांनीही पक्षाचे अतोनात नुकसान केले. अनेक लोक आपले दलाली व तोडपाण्याचे उद्योग वाढविण्यासाठी आपमध्ये आले होते. ब:याच भांडवलशहांनी आपले एजंट आपमध्ये घुसवले होते. दिल्लीतील राजीनामा प्रकरणानंतर हे सगळे संघवाले, संधीवाले आणि सेटर लोक पक्षापासून आपोआपच लांब झाले. याला कारण म्हणजे हे सगळे टीव्हीमधून प्रसारित होणा:या बातम्या ऐकून आपला मार्ग ठरविणारे होते. ते लांब गेले हे आम आदमी पार्टीसाठी चांगलेच झाले. पण आम आदमी पार्टीबद्दलच्या अपप्रचारामुळे अनेक चांगले कार्यकर्ते पक्षाशी जुळले नाहीत. दिल्लीतील आताच्या विजयाने असे चांगले कार्यकर्ते आता पुढे येत आहेत. पण आपच्या केंद्रीय समितीच्या नेत्यांमधील भांडणांमुळे हे कार्यकर्ते थबकले आहेत. त्यांना प्रश्न पडलाय- शुद्ध राजकारणाचे असे का होते? या देशात शुद्ध राजकारण करता येऊच शकत नाही का?
जनतेची अवस्था
मी लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारानिमित्त जवळ जवळ 7क्क् गावांमध्ये फिरलो. जनतेची मानसिकता अगदी जवळून पाहिली, जाणली. लोकांना आपल्या धर्माचे रक्षण करेल असा देवाचा अवतार नेता म्हणून हवा होता. त्यापलीकडे जनता काहीच ऐकायला तयार नव्हती. हा अवतार आला म्हणजे देशात सारे ‘अच्छे’’ होईल असा पक्का विश्वास प्रसारमाध्यमे व प्रचारतंत्रंनी जनतेत निर्माण केलेला होता. त्यानुसार जनतेने आपले, आपल्या देशाचे आणि धर्माचे रक्षण करेल असा नेता निवडला.
भारतीय मतदार आपले मत घरी बसल्या टीव्ही बघून, अफवांवर विश्वास ठेवून आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या चाकोरीत राहूनच निश्चित करतो, हे गेल्या सहा दशकांत दिसून आले आहे. अनेकदा जात, धर्म, घराणो, प्रसारमाध्यमे व पैसा यांचाच प्रभाव मतदानावर अधिक असतो. आम आदमी पार्टीने तिकीट वाटताना या बाबींना मूठमाती दिल्याने प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला भेदणो अतिशय अवघड होऊन बसते. जनता ज्या मुद्दय़ांना धरून मतदान करते ते आम आदमी पार्टी अंगीकारत नसल्याने राजकीय प्रगतीत आपपुढे मोठा अडसर उभा राहतो. एक मोठा मुद्दा आहे तो जनतेच्या दृष्टिकोनाचा. जात, धर्म, घराणो, पैसा आणि जाहिराती अशा मार्गांना प्राधान्य देऊन मत दिले गेल्यास शुद्ध मार्गावरील कार्यकत्र्याचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहत नाही. भारतीय मतदाराच्या डोक्यातील निवडणुकीप्रती असलेली गुलामगिरीची मानसिकता शुद्ध राजकीय चळवळींना मारक आहे. भारतीय लोकशाहीच्या मूळ मालकाने यामुळेच भारतात शुद्ध राजकारण करणो अवघड करून ठेवले आहे.
भारतीय मीडिया
भारतीय मीडियावर उघड उघड ताशेरे ओढून अरविंद केजरीवाल आणि टीमने एक नवा पायंडा पाडला. प्रसारमाध्यमांनी आम आदमी पार्टीसारख्या राजकीय मंचांना समूळ उपटून फेकण्याच्या प्रयत्नात खूप मोठा हातभार लावलाय यात शंका नाही. हवे तेव्हा या चळवळींना उचलून धरायचे आणि नंतर वेळ आल्यावर आपल्या लेखणीने चिरडून टाकण्याचे कामही भारतीय प्रसारमाध्यमे करतात. तेव्हा भारतीय मतदार, भारतीय मीडिया आणि शुद्ध राजकारणाच्या चळवळीतले कार्यकर्ते हे सगळेच अशा चळवळी दीर्घकाळ टिकू न देण्यासाठी जबाबदार आहेत. हे तिन्ही घटक जबाबदारीने वागतील, तर ख:या अर्थाने यंत्रणा परिवर्तन दूर नसेल.
(लेखक आम आदमी पक्षाचे जळगाव जिल्हा संयोजक आणि एरंडोल येथील ‘सम्यक फाउंडेशन’चे
संस्थापक आहेत.)