शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
4
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
5
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
6
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
7
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
8
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
9
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
10
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
11
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
12
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
13
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
14
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
15
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
16
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
17
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
18
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
19
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
20
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी

हिमालयातला येती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 06:05 IST

हिमालयात खरेच ‘येती’ अस्तित्वात आहेत? हिमालयातल्या भटकंतीत निदान आम्हाला तरी कधी ते दिसले नाहीत. अनेक ठसे दिसले; पण ते ‘येती’चे कशावरून? उष्णतेमुळे हिम वितळून ठसे रूंदावतात, सैल होतात.  पावलांचे ठसे मोठे होतात.  उंचावर ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.  काहीसे अंधूक दिसायला लागते, काही भासही होऊ शकतात.  येती ही अशीच काल्पनिक धारणा असू शकते, मात्र शास्त्रीय पद्धतीने त्याच्या मुळाशी जायला हवे.

ठळक मुद्देहिमालयात खरेच येती आहेत हे वास्तव की भाकडकथा?

- उष:प्रभा पागे

हिमालयात खरेच ‘येती’ (हिममानव) आहेत? त्यांना प्रत्यक्ष पाहिलेय कोणी? तिथल्या हिमशिखरांचे ते संरक्षण करतात? या केवळ भाकडकथा की ते खरोखरच अस्तित्वात आहेत? ‘येती’च्या संदर्भात आजही अनेक वाद, प्रतिवाद आहेत. भारतीय सैन्यदलाने नेपाळ-चीन सीमेवर मकालू बेस कॅम्पजवळ मोठय़ा प्राण्याच्या पावलांचे ठसे दिसल्याचा दावा नुकताच केला आणि ‘येती’ (हिममानव) पुन्हा चर्चेत आले. त्याचे अस्तित्व मात्र इतक्या वर्षांत अद्यापही सिद्ध झालेले नाही. ‘येती’ हा एक महाकाय, उंचावर राहणारा आणि अस्वलासारखा दिसणारा प्राणी आहे, असे तिबेटी लोक त्याचे वर्णन करतात. हिमालयातील दंतकथेनुसार येती या प्राण्याला अद्याप कोणीच पाहिलेले नाही, पण यावरून तो अस्तित्वातच नाही असेही म्हणता येणार नाही. ज्याप्रमाणे कित्येक वर्षांच्या संशोधनानंतर मानवाला कृष्णविवराचा फोटो मिळवण्यात यश मिळाले त्याप्रमाणे संशोधन सुरूच ठेवल्यास कधी ना कधी येतीच्या अस्तित्वाबद्दल काहीतरी ठोस माहिती कदाचित आपल्याला मिळूही शकेल. शक्यता अशीही आहे की येती हा पूर्णपणे काल्पनिक प्राणी असून, ज्याचे ठसे मिळाले तो कदाचित वेगळ्याच प्रजातीचा जीव असू शकेल. पण जे काही असेल त्याचा शास्त्रीयरीत्या शोध घेऊन त्याचे निष्कर्ष जगासमोर मांडले गेले पाहिजेत.अनेक नेपाळी दंतकथांमध्ये ‘येती’चा उल्लेख आढळतो. पहिले एव्हरेस्टवीर तेनसिंग नोर्गे यांनीही त्यांच्या आत्मचरित्रात त्याचा उल्लेख केला आहे. पर्वतांवर दानव, येती यासारखे उग्र प्राणी असून, ते पर्वतांचे संरक्षण करतात, अशी लामांनी त्यांच्याविषयी समजूत करून दिली होती.  याखेरीज तेनसिंगच्या वडिलांनी दोनवेळा येतीला पाहिले असल्याचे त्यांनी पुस्तकात आधी नमूद केले होते; परंतु दुसर्‍या आवृत्तीच्या वेळी त्यांनी स्वत:च त्यावर शंका उपस्थित केली आणि हा एखादा वेगळा किंवा काल्पनिक प्राणी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. मुळातच ‘येती’बद्दल फारशा आख्यायिका नाहीत. हिमालयात राहणार्‍या लोकांचा असा विश्वास आहे की तो महाकाय केसाळ प्राणी आहे. त्याला ते अपशकुनी मानतात. येती दिसणे म्हणजे हवामानाने रौद्र रूप घेणे किंवा विपरीत घटनांचा तो संकेत असल्याचे त्यांना वाटते. एव्हरेस्टवर तेनसिंग यांना काही ठसे मिळाले होते, त्यावेळी शेरपांना ते येतीचेच असल्याचे वाटत होते; पण जोवर शास्त्रीय पुरावा मिळत नाही तोवर त्याचे अस्तित्व मानण्यास त्यांचा नकार होता. येतीच्या संदर्भात ब्रिटिश लोकांची वर्णने 1832 सालापासून आहेत. उत्तर मोहिमेच्या ट्रेकमध्ये एका ब्रिटिश ट्रेकरला काही ठसे आढळून आले होते. तेव्हाही शेरपा यांनी ते येतीचेच असल्याचा निर्वाळा दिला होता. बाहेरून आलेल्या व्यक्तींनी स्थानिक लोकांना येतीच्या संदर्भात माहिती विचारली तर ‘येती’ आहेच, असे छातीठोकपणे ते  सांगत. शेरपा आणि स्थानिक लोकांवर दंतकथांचाही मोठा पगडा आहे. त्यामुळेही येती नाहीत, यावर विश्वास ठेवण्यावर त्यांचा नकार आहे.          हिमालयात जाणार्‍या आमच्यासारख्या गिर्यारोहकांनाही येतीचे खूप आकर्षण वाटायचे. एव्हरेस्ट परिसरात तर येतीची ‘खोपडी’ ठेवलेली आहे. त्याचाही शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास झाला; पण ही खोपडी नक्की कुणाची, याबाबत अनेक तर्कवितर्क अद्याप कायम आहेत. त्यामुळे येतीचे अस्तित्व सिद्ध होऊ शकले नाही. हिमालयात ज्यावेळी आम्ही गिर्यारोहणाला जात असू, तेव्हा आम्हालाही काही ठसे दिसत असत, पण आजवर कधीच ‘येती’सदृश कोणताच प्राणी आम्हाला तिथे दिसला नाही. काही प्राण्यांचे अस्तित्व जाणवायचे; पण त्यांचे दर्शन मात्र कधी घडले नाही. हिमालयात भटकंती करताना, अनेकदा कित्येक ठसे आम्हालाही दिसले, पण ते कुणाचे असावेत याचा काहीच अंदाज बांधणे शक्य नव्हते. मात्र हेही तितकेच खरे की, येतीच्या अस्तित्वाचे पुरावे म्हणून ज्या महाकाय ठशांचे वर्णन केले जाते, तसे भलेमोठ्ठे ठसे आम्हाला कधीही दिसले नाहीत. एव्हरेस्ट पर्वतावर येतीचा शोध घेण्यासाठी 1954 मध्ये ब्रिटिश आणि हिंदी गिर्यारोहकांची एक खास तुकडी गेली होती. मात्र या तुकडीलाही प्रत्यक्ष येती दिसला नाही. हिमालयात ‘यती’चे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध कॅमेरा ट्रॅपिंगमधून घेतला तर यावर काहीतरी प्रकाश पडू शकेल. या भागांमध्ये हिमबिबळ्याचे अस्तित्व दिसून आले आहे, ब्राउन बेअर असल्याचेही उल्लेख आहेत. खरे तर हिमालयात ब्राउन बेअर आढळत नाहीत; पण येतीचे उल्लेख त्याच्याशी मिळतेजुळते आहेत. आर्मीला जे ठसे मिळाले, ते एकेरी रांगेत आहेत, ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे; पण यावरून काही अंदाज बांधणे चुकीचे ठरू शकेल. उष्णतेमुळे ठसे रूंदावतात आणि सैल होतात. हळूहळू हिम वितळल्यामुळे पावलांचे ठसे मोठे होतात हे त्या ठशांमागील कदाचित सत्य असू शकते. उंचावर गेल्यानंतर ऑक्सिजनचे प्रमाण कमी व्हायला लागते. काहीसे अंधूक दिसायला सुरुवात होते आणि समोरून कुणी गेलेय असा भासही होऊ शकतो. येती ही काल्पनिक धारणादेखील असू शकते. मात्र त्याच्या मुळाशी जायला हवे. तोपर्यंत तरी त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह कायमच राहील. दंतकथा आणि इतर ऐकीव गोष्टींमधून हा येती कायम डोके वर काढत राहील.

‘येती’ नव्हे, अस्वल!भारतीय सैन्यदलाला नेपाळ-चीन सीमेवर मकालू बेस कॅम्पजवळ जे ठसे सापडले ते ‘येती’चे असल्याचा दावा केला जात होता. हे ठसे नक्की कुणाचे, याचा शोध घेण्यासाठी नेपाळ सरकारने तज्ज्ञांचे एक पथक त्या ठिकाणी धाडले. त्यांच्या म्हणण्यानुसार हे ठसे ‘येती’चे नसून ‘अस्वला’चे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 

‘मेत्री’ आणि ‘चत्री’शेरपांच्या समजुतीप्रमाणे ‘येतीं’चे दोन प्रकार आहेत. एक ‘मेत्री’ म्हणजे नरभक्षक व दुसरा ‘चत्री’ म्हणजे पशुभक्षक. या दोन्ही येतींचे पाय मागील बाजूस वळलेले असतात, त्यातील ‘चत्री’ जातीचा येती अधिक मोठा, एखाद्या अस्वलासारखा दिसतो, असा दावा अनेक शेरपा करतात. प्रसिद्ध शास्त्रज्ञ ज्युलियन हक्सलेदेखील येती म्हणजे अस्वलासारखा प्राणी असल्याचे मानत; पण काहीजणांच्या मते येती हा मोठय़ा माकडासारखा दिसणारा पशू आहे.(लेखिका ज्येष्ठ गिर्यारोहक आणि ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या संस्थापिका आहेत.) मुलाखत व शब्दांकन : नम्रता फडणीस