ये इश्क इश्क है इश्क इश्क.

By Admin | Updated: March 23, 2015 19:21 IST2015-03-23T19:21:39+5:302015-03-23T19:21:39+5:30

हिंदी चित्रपटांतील हजारो, लक्षावधी गाणी. त्यातल्या प्रातिनिधिक, अत्यावश्यक आणि ‘संचित’ ठरणा-या गाण्यांची निवड करायची ठरली तर एक गाणो त्यात नक्की असेल.

Yeh Ishq Ishq Is Ishq Ishq | ये इश्क इश्क है इश्क इश्क.

ये इश्क इश्क है इश्क इश्क.

विश्रम ढोले
 
हिंदी चित्रपटांतील हजारो,  लक्षावधी गाणी. त्यातल्या प्रातिनिधिक, अत्यावश्यक आणि ‘संचित’ ठरणा-या गाण्यांची निवड करायची ठरली तर एक गाणो त्यात नक्की असेल.
----------
 
ख्रिश्चनांच्या जेनेसिसमध्ये प्रलय आणि नोहाच्या नौकेची एक कथा आहे. देवाच्या आज्ञेनुसार नोहा एक नौका बनवितो, त्यात सर्व प्राण्यांची एकेक उत्तम जोडी घेतो आणि जीवसृष्टीला प्रलयातून नष्ट होण्यापासून वाचवतो, असा त्या कथेचा आशय आहे. आपले अत्यवश्य असे संचित अगदी प्रलयातही टिकवून धरलेच पाहिजे हा या कथेचा एक महत्त्वाचा संदेश. नोहाच्या नौकेचे हे रूपक हिंदी चित्रपटगीतांच्या सृष्टीला लावायचे ठरविले तर? कोणती गाणी अत्यवश्य संचित म्हणून या नौकेवर घ्यावीच लागतील? कल्पनेचा हा खेळ वेडगळ वाटेला तरी तो कठीण आहे. इतक्या सा:या गाण्यांमधून अत्यावश्यक, प्रातिनिधिक आणि संचित या विशेषणांना सार्थ ठरविणा:या गाण्यांची निवड करणो नक्कीच सोपे नाही. पण एक मात्र खरे की, ज्यांच्या निवडीवरून फार वाद होणार नाहीत अशा काही मोजक्या गाण्यांमध्ये बरसात की रात (196क्) मधील ‘ये इश्क इश्क है इश्क इश्क’ ही कव्वाली नक्की असेल.
ही कव्वाली खरंतर अनेक अर्थाने विलक्षण आणि प्रातिनिधिक आहे. चित्रपटाच्या एका अतिशय नाट्यमय वळणावर ती येते. एकतर दोन कव्वाल पार्ट्यांमधील प्रतिष्ठेचा मुकाबला म्हणून ही कव्वाली येत असल्यामुळे त्यात आव्हान-प्रतिआव्हान, हार-जित वगैरे नाट्य मुळातच आहेच. दुसरीकडे ताटातुट झालेले नायक नायिका (भारतभुषण आणि मधुबाला) एकत्र येणो आणि त्यामुळे नायकावर एकतर्फी प्रेम करणारी कव्वाल चरित्र नायिका (श्यामा)शोकविव्हळ होणो हे देखील या कव्वालीतून उलगडत जाते. हे होत असताना तिसरीकडे नायिकेचा बाप संतापून पिस्तूल वगैरे घेऊन हे प्रेम संपवायला निघतो. त्यामुळे चित्र पटाच्या कथेमध्ये ही कव्वाली ठिगळरूपात न येता कथानकाला चरम बिंदूला पोहचिवणारे स्वाभाविक भावनाट्य म्हणून येते. कव्वालीच्या अनेक ओळींमधून कथेच्या या वळणांचे सूचक वर्णन येत राहते. विविध नाट्यांची इतकी सहज आणि  सुंदर गुंफण करत कथेला क्लायमॅक्स पर्यंत पोहचिवणारे गाणो तसे विरळच. 
पण पडद्यावर घडणा:या मेलोड्रामा इतकाच मेलोड्रामा गाण्याच्या पातळीवरही घडत राहतो. खरंतर ‘ये इश्क इश्क है’ ही ऐकताना स्वतंत्र वाटावी अशी कव्वाली प्रत्यक्षात तब्बल बारा मिनिटांच्या जोड कव्वालीचा एक भाग आहे. ‘ना तो कारवाँ की तलाश है’ने तिची सुरूवात होते आणि  नंतर एका सहजक्र माने ‘ये इश्क इश्क’ सुरू होते. कव्वालीचा ठेका तर एव्हाना तुमच्या अंगात भिनलेला असतोच, पण त्यातले शाब्दीक सवाल-जबाब, खटकेबाज ओळी, आव्हान प्रतिआव्हान यांनीही तुमचा ताबा घेतलेला असतो. पर्शियन प्रभावातील उर्दू, ब्रजभाषेच्या वळणाची हिंदी आणि  रांगडी पंजाबी अशा तीन भाषांची गोडी घेत त्यातील तुकडे आणि  कडवी साकारत जातात.  एकाच गाण्यात, ‘वहशत ए दिल’,‘रश्न ओ दार’ ‘इश्क न पुछ्छे जाताँ’, ‘गर्म लहु विच्च’, ‘डगर पनघटकी’, ‘जान-अजान का ध्यान’ अशी भन्नाट आणि सकारण त्रैभाषिक सरमिसळ साहिर लुधियानवीसारखा सिद्धहस्त कवी-गीतकारच करू जाणो. आणि या सुंदर शब्दांना आणि नाट्याला तितकाच उत्कृष्ट न्याय दिलाय तो मन्ना डे, मोहम्मद रफी, आशा भोसले, एस. डी बातिश, सुधा मल्होत्र यांच्या सुरांनी आणि रोशन यांच्या संगीताने. ही कव्वालीच नव्हे तर बरसात की रातमधील जिंदगी भर नही भुलेंगी वो बरसात की रात, गरजत-बरसत सावन आयो रे,  मैं ने शायद तुम्हे ही देखील रोशन यांनी काही अप्रतिम गाणी आहेत.
पण ये इश्कइश्कचे मोठेपण शब्द, सुर आणि नाट्य यांच्या समसमा संयोगापुरतेच मर्यादित नाही. हिंदी चित्रपटांनी आणि गीतांनी प्रेमाची महती गाण्याकरिता जागविलेल्या बहुतेक प्रतिमा आणि मिथके या गाण्यात उपस्थिती लावून जातात. लैलामजनू, शम्मा परवाना, दिल-खंजर, कृष्ण राधा, कृष्ण-मीरा, कृष्णाची बांसरी, यमुनातट वगैरे उर्दू-हिंदी प्रेमकाव्यातील सा:या  प्रतिमा आणि मिथक त्यांच्या त्यांच्या अर्थसृष्टीसह  येऊन या गाण्याची पाळेमुळे हिंदी चित्रपटांना आवडणा:या आपल्या मिश्र संस्कृतीत खोलखोल रूजवितात. प्रेमाची महती सांगण्यासाठी या गाण्याची काव्यकळा या मिथकांच्याही पलीकडे जाऊन अल्ला, रसूल, गौतम (बुद्ध), मसीह (येशू), मुसा (मोङोस) अशी स:यांची साक्ष काढते. कुराण, हदिथ आणि धर्मग्रंथांचे दाखले देते. कायनातिजस्म है जान इश्क ही ओळ तर चक्क वेद-उपनिषदांमधील प्रकृती आणि पुरु ष यांच्यातील अद्वैताची आठवण करून देते. पूर्वेकडे वाहणा:या यमुनेपासून ते पश्चिम टोकाला असलेल्या कोहएतूर पर्यंतच्या (सिनाई पर्वत) आशियाई भूमीतील सा:या धार्मिक-सांस्कृतिक प्रतिमासृष्टीचा आधार घेत ही कव्वाली मुक्तकंठाने आणि (अगदी शब्दश:देखील) उच्चरवाने प्रेमाची थोरवी गात रहाते. प्रेमाला एका गुढ, अध्यात्मिक पातळीवर नेत रहाते. म्हणूनच केवळ कव्वालीच्या रुपामुळेच नव्हे तर आत्म्यानेही ते आधुनिक सुफीगीत बनत जाते. प्रेमाच्या निमित्ताने या सा:या सांस्कृतिक संचिताची सफर घडवून आणते. हिंदी चित्रपटासारख्या बाजारू किंवा कामचलाऊ वातावरणात राहूनही इतकी वैविध्यपूर्ण सांस्कृतिक अर्थगर्भता देणारी इश्क इश्क सारखी गाणी फार दुर्मिळ. 
इश्क इश्कचा एक संदेश याच्याही पलिकडे जाणारा आहे. त्याची प्रेरणा आधुनिकतेशी नाते सांगणारी आहे. आपल्या परंपरेने स्त्री-पुरूष शृंगाराला तर निश्चितपणो मोठे स्थान दिले आहे. पण वैयिक्तक निवडीतून निर्माण होणा:या स्त्री-पुरु ष प्रेमाकडे मात्र परंपरा उदारपणो पहात नाही. प्रसंगी ती अशा प्रणयी प्रेमाला (रोमॅन्टिक लव्ह) साफ नकार देते. धर्म, जात, गोत्र, सामाजिक-आर्थिक स्थान, कुटुंब आणि पालक यांच्या कडक चाळण्यांमधून टिकू शकले तरच प्रेमाला आणि एका अर्थाने व्यक्तीच्या सर्वोच्च वैयिक्तक आकांक्षेला परंपरा मान्यता देते. आधुनिकतेने जागविलेले स्व भान आणि व्यक्तीस्वातंत्र्य परंपरेला अनेक ठिकाणी काचते. प्रणयी प्रेमाच्या प्रांतात तर जास्तच. हिंदी चित्रपट आणि गाण्यांनी प्रणयी प्रेमाला इतके मोठे स्थान देऊन आणि सातत्याने त्याची महती गाऊन परंपरेविरुद्ध एक आधुनिक सृजनशील असे बंडच केले आहे. ये इश्क इश्क हे त्यातील एक सर्वोच्च बंडखोर गाणो. ज्यांच्या नावाखाली परंपरा प्रेमावर बंधन घालू पहाते ते ईश्वर आणि प्रेषित हेच प्रेमाचे पाठराखे आहे असे सांगते. हिंदू आणि मुसलमान, ब्राह्मण आणि शेख यांच्या रूपातून अनुभवायला येणा:या परंपरेला आव्हान देते. इतकेच नव्हे तर ‘खाक को बुत.बुतको देवता करता है इश्क.इंतेहा ये है की. बंदे को खुदा करता है इश्क’ अशी व्यक्तीच्या सर्वोच्च उन्नयनाची ग्वाही देखील देते. ‘कोहम?’ या शोधात असलेल्या ‘स्व’ ला परंपरा ‘अहंब्रह्मास्मि’ असे उत्तर देते. पण खुदा बनण्याचा हा प्रवास प्रेमाच्या म्हणजे एका अर्थाने स्वभानाच्या, स्वातंत्र्याच्या आधुनिक मार्गानेच होऊ शकतो असा संदेश देत हे गाणो परंपरेला तिच्याच मैदानात, तिच्याच शस्त्रंच्या मदतीने खुप खोलवरचे आव्हान देते. ये इश्क इश्क है हे गाणो अत्यवश्य, प्रातिनिधिक आणि संचित ठरते ते या अर्थाने. 
- म्हणूनच या गाण्याला नोहाच्या नौकेत निश्चितच स्थान आहे. कदाचित पहिले जाण्याचा मानही.
 
प्रतिमा, प्रसंगांची ‘बरसात’
बरसात की रात ची सगळीच गाणी खूप गाजली. एक संगीतकार म्हणून रोशन यांची कारकीर्द जरी आधीच सुरू झाली असली तरी या चित्रपटाने त्यांना लोकिप्रयतेच्या शिखरावर नेले. बरसात की रात ने लोकप्रिय केलेल्या अनेक प्रतिमा, प्रसंग नंतर अनेक चित्रपटांमधून थोड्याफार फरकाने येते गेले.
 
‘साठी’चे प्रेम
प्रेम संकल्पनेवर आधारीत चित्रपट आणि गीतांसाठी 196क् साल ऐतिहासिक ठरले. बरसात की रात प्रमाणोच मुगल ए आझम, कोहीनूर, चौदवी का चाँद, दिल अपना और प्रीत परायी हे चित्रपट आणि  त्यातील गाणीही खुप गाजली. गाण्यांमध्ये प्रेम हा विषय या पूर्वीपासूनच मध्यवर्ती होताच. पण 196क् च्या अपार यशानंतर तर ते स्थान अजूनच बळकट होत गेले आणि इतर विषय पार पिछाडीवर पडत गेले.  
 
बंडखोर प्रेमाची महती
ये इश्क इश्क है प्रमाणोच बंडखोर संदर्भात प्रेमाची महती गाणारी दोन गाणी मुगल ए आझम मध्येही आहेत. ङिांदाबाद ङिांदाबाद ए मोहोब्बत ङिांदाबाद आणि  प्यार किया तो डरना क्या ही गाणीही खूप गाजली. प्यार किया तो डरना क्या तर ऑल टाईम प्रकारातले. ङिांदाबाद ङिांदाबादची शब्दकळा आणि प्रतिमासृष्टी इश्क इश्कशी बरीच मिळतीजुळती आहे. 
 
(लेखक माध्यम, तंत्नज्ञान आणि संस्कृती या विषयाचे अभ्यासक आहेत.)
 

 

Web Title: Yeh Ishq Ishq Is Ishq Ishq

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.