कधी समजणार?

By Admin | Updated: November 15, 2015 18:13 IST2015-11-15T18:13:15+5:302015-11-15T18:13:15+5:30

माझा एक मित्र ङोन शिक्षक आहे. मी त्याच्याशी अनेकवेळा बोलतो. आम्ही दोघांनी बरोबर अनेक शिबिर-साधना केली आहे.

Will you ever understand | कधी समजणार?

कधी समजणार?

>धनंजय जोशी
 
माझा एक मित्र ङोन शिक्षक आहे. मी त्याच्याशी अनेकवेळा बोलतो. आम्ही दोघांनी बरोबर अनेक शिबिर-साधना केली आहे.
त्याच्याशी सहज बोलत होतो. मी त्याला सांगत होतो, ‘अरे परवा एक साधक - मित्र भेटला होता आणि म्हणाला, ‘इतक्या वर्षानंतरदेखील मला ही साधना ‘समजत’ नाही’! माझा मित्र हसला आणि म्हणाला, ‘त्याला सांग की ते ‘समजण्या’पलीकडचं आहे.’
खरा अर्थ असा की, आपण साधना ‘समजण्याचा’ प्रय} एकदा सोडून दिला की ‘साधना’ आपलं आयुष्यच बनून जाते. मी सध्या आमच्या जवळच्या शाळांमध्ये सबस्टिटय़ूट शिक्षक म्हणून काम करतो. ज्या मुलांना डाऊन सिण्ड्रोम किंवा सेरेब्रल पाल्सीसारखी दु:खे असतात त्यांना शाळेत खूप मदत लागते. त्यांचे वेगळे वर्ग असतात. त्या वर्गामध्ये मी काम करतो. ह्या मुलांना अनेक गोष्टी करता येत नाहीत; पण एका परीनं खूप हुशारपण असतात. आश्चर्य वाटतं आपल्याला बघून!
काल मी अशा एका वर्गामध्ये होतो. त्या मुलांना गाणी आवडतात म्हणून आम्ही कम्प्युटरवर गाणं सुरू केलं. गाणं सुरू झालं आणि दोन मुलं उठून त्या गाण्याच्या तालावर नाचू लागली. त्यांना जसं येईल तसं ! माङया मनात विचार आला, ‘ह्यांना खरंच ‘साधना’ समजली. आपली स्थिती ‘संपूर्ण’ विसरून त्यांना ‘नाच’ सापडला होता. सान सा निम म्हणायचे, ‘पुट डाऊन युअर सिच्युएशन, युअर कंडिशन !’
- ह्या मुलांनी ते आचरणात आणलं होतं !
‘पुट डाऊन युअर कंडिशन’चा अर्थ मला थोडासा समजला होता, पण एका विद्याथ्र्याचा ‘डायपर’ बदलावा लागला तेव्हा जास्त समजला! आपण  गाण्याच्या/नाचाच्या कार्यक्रमाला जातो. नंतर म्हणतोदेखील, ‘छे, चांगलं नाही वाटलं !’ ही मुलं नाचत होती तेव्हा त्यांची साधना ‘चांगलं/ वाईट’च्या पलीकडे गेली 
होती. एक विलक्षण समाधान त्यांच्या चेहे:यावर दिसत 
होतं! आपल्या आयुष्यामध्ये आपण असं का नाही जगू शकतं? प्रत्येक ‘क्षण’ आपल्या समोर उभा राहतो आणि म्हणतो, ‘नाच माङया तालावर’ पण आपण का नाही नाचू शकत? मी त्या मुलाकडून खूप शिकलो, साधनेची सहजता, ‘समजण्या’पलीकडची असते हे रहस्य उमगलं मला ! आपल्या ‘विचारांचा’ डायपर बदलला गेला सहजच!
 
(अमेरिकेतील शिकागो या शहरात वास्तव्याला असणारे लेखक ङोन साधक/ अभ्यासक आहेत.)
 
joshi5647@gmail.com 
 

Web Title: Will you ever understand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.