शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

ढगफुटी! का? कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 6:00 AM

भारतातील मान्सूनचा पॅटर्न बदलत चालला आहे.  त्यामुळे गेल्या वीस-पंचवीस वर्षांत अनेक ठिकाणी  ढगफुटीच्या किंवा अतिवृष्टीच्या  पावसाचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देमान्सूनचा बदलता पॅटर्न पाहता भारताने आता अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. भारताचे अर्थकारण हे शेतीशी निगडित राहणार आहे. शेती पावसाच्या पाण्यावर आणि त्यात होणार्‍या बदलांवर अवलंबून असणार आहे.

- वसंत भोसले

भारतातील मान्सूनचा पॅटर्न बदलत चालला आहे. मान्सूनचे वारे वाहण्याची दिशा कायम असली तरी ती बंगालच्या उपसागराकडे सरकली आहे. परिणामी बंगालच्या उपसागरात खालच्या बाजूसही चक्रीवादळे निर्माण होऊ लागली आहेत. पूर्व-पश्चिम, ईशान्य भारत, आदी विभागांत पडणार्‍या पावसाचे प्रमाण व्यस्त होत आहे. त्यामुळे गेल्या वीस-पंचवीस वर्षांत अनेक ठिकाणी ढगफुटीच्या किंवा अतिवृष्टीच्या पावसाचे प्रमाण वाढले आहे.खरीप हंगामाची कापणी किंवा पीक काढणी सुरू होत असताना परतीच्या पावसाची सुरुवात होत राहणे समजता येईल. मात्र, त्याऐवजी ऑक्टोबरच्या मध्यावर अतिवृष्टीचा तसेच काही ठिकाणी ढगफुटीचा तडाखा बसू लागला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होणार्‍या बाष्पामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्याचवेळी ऑक्टोबरच्या उन्हाच्या तापमानाने मध्य भारतातील जमिनीवरील पाण्याचे बाष्पही वाढते. त्यातून हवेत पोकळी तयार होते तेव्हा बंगालच्या उपसागरातील बाष्पाचे ढग वेगाने आंध्र, तेलंगणा, ओडिशा आणि तमिळनाडूच्या म्हणजे भारताच्या पूर्वेकडील किनारपट्टीवर येऊन आदळू लागतात. त्याचा वेग कमी की अधिक याचा अंदाजही बांधता येतो. त्यासाठी ‘ऑक्टोबर हिट’च्या तापमानाशी संबंध येतो. मान्सूनच्या पावसाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्यप्रदेश, छत्तीसगड अर्थात मध्य भारतातील प्रदेश ओला चिंब झालेला असतो. त्यावर उन्हाच्या तडाख्याने बाष्प वाढते ते जसे वर-वर जाते, तसा कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि बंगालच्या उपसागरावरील ढग पळत आल्याप्रमाणे किनारपट्टीवर येऊन धडकतात.चालूवर्षीदेखील हीच प्रक्रिया झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे, पण त्यात एक गुणात्मक फरक आहे. तो एक योगायोगही म्हणायला हरकत नाही. किंबहुना मान्सूनच्या पॅटर्नमधील बदलाची ती एक झलकही आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यावर अरबी समुद्रातदेखील ही प्रक्रिया झाली. याचे कारण प्रामुख्याने सांगितले जाते की, मान्सूनचा पाऊस 1 जूनपासून सुरू झालाच नाही. जूनमध्ये झालेला पाऊस हा पूर्व मान्सून होता तेव्हा हवामान खात्याने अंदाज बांधला की मान्सूनचा पाऊस वेळेवर येतो आहे. मान्सूनपूर्व पावसाने जमिनीत ओलावा तयार होताच अनेक प्रांतांतील शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या. विशेषत: सोयाबीन, बाजरी, मका, भात, धान, कांदा, आदींची पेरण्या, लागवडी करण्यात आल्या. प्रत्यक्षात बदललेला मान्सूनच्या पॅटर्ननुसार जुलै महिना कोरडाच गेला आणि ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यापासून मान्सूनची सुरुवात झाली. हा लांबलेला मान्सून अद्याप चालू आहे. त्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे रूपांतर अतिवृष्टी किंवा ढगफुटीच्या पावसात होत आहे, असे अनेक संशोधकांचे मत आहे.

भारतात दीडशे वर्षांपासून विज्ञानाच्या आधारे मान्सून वार्‍यासह येणार्‍या पावसाचा अभ्यास करण्यात येतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पावसावरच अवलंबून असणारी शेती आणि धरणांचा पाणीसाठा! या पाणीसाठय़ाच्या जोरावरच भारताने सुमारे चाळीस टक्के लागवडीखालील क्षेत्र ओलिताखाली आणले आहे. हिमालय पर्वतरांगांतून बारमाही येणार्‍या पाण्याचा वाटा त्यात असला तरी साठवणुकीसाठी मान्सूनचा पाऊस महत्त्वाचा ठरतो. अलीकडच्या काळात अतिवृष्टी किंवा ढगफुटीसारखे प्रकार खूप वाढले आहेत. गेल्या शतकात किंवा अलीकडच्या एकविसाव्या शतकातील दोन दशकांत घडलेल्या घटनांच्या नोंदी पाहिल्या तरी हा पॅटर्न वेगाने बदलेला आहे, असे आपणास दिसेल.सर्वांत जुनी आणि मोठी नोंद हैदराबाद शहराची आहे. हे शहर मुसी नदीच्या काठावर वसलेले आहे. विकराबाद परिसरातील अनंथागिरी पर्वतात उगम पावणारी मुसी नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. 28 सप्टेंबर 1908 रोजी केवळ दोन तासांत सतरा इंच (425 मिलिमीटर) पाऊस या नदी परिसरात झाला आणि हैदराबाद शहरात हाहाकार उडाला होता. त्यात पंधरा हजार माणसे मृत्युमुखी पडली. 80 हजार घरांचे नुकसान झाले होते. शंभर मिलिमीटर पाऊस एका विशिष्ट भागात एक तासात पडला की एक लाख मेट्रीक टन वजनाचे पाणी कोसळते. 425 मिलिमीटरने हैदराबादची काय अवस्था झाली असेल पहा. दोन दिवसांपूर्वीही याच शहरात केवळ अडीच तासांत दोनशे मिलिमीटर पाऊस कोसळला. हा सर्व ढगफुटीचा प्रकार आहे. हा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचा, मान्सूनचा पाऊस लांबल्याचा, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसाने निर्माण झालेल्या बाष्पाचा परिणाम आहे.अनेकदा ढगफुटीचे प्रकार हे हिमालयाच्या पर्वतरांगांमध्येच होतात, असा आपला समज आहे आणि  इतिहासातील नोंदीमध्ये डोकावल्यास त्याची खात्रीदेखील होते. मध्य भारतातील मैदानी प्रदेशावर मान्सूनचा पाऊस पडून गेलेला असतो. त्यातून निर्माण झालेल्या बाष्पाचे ढग उत्तरेकडे सरकतात. उंचावरील थंड हवेने ते मोठय़ा थेंबाच्या पाण्याच्या स्वरूपात कोसळतात. पूर्वी असेही मानले जात होते की, मध्य भारतात ऑक्टोबरच्या कडक उन्हाने तापणारी हवा पोकळी निर्माण करते. परिणामी हिमालयाकडील थंड वारे या भागाकडे वाहत राहतात. त्यात ढगांची वेगाने वाहण्याची प्रक्रिया होऊन एकमेकांवर आदळून कडकडणार्‍या विजांसह ढगफुटी होत राहते. लडाखमधील लेह येथे 2 ऑगस्ट 2010 रोजी एका तासांत 250 मिलिमीटर पाऊस झाला. हाहाकार उडाला. एक हजार लडाखी माणसांचा जीव घेतला. पुण्याजवळच्या खडकवासला धरणाजवळ राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) परिसरात 29 सप्टेंबर 2010 रोजी एका तासात 144 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यात मनुष्यहानी झाली नाही, पण नुकसान मोठे झाले होते. खडकवासला धरणाच्या पाण्याच्या बाष्पाचा तो परिणाम होता, असे मानले जाते. त्यानंतर केवळ पाच दिवसांनी (4 ऑक्टोबर 2010 रोजी) पुण्यातील पाषाण भागात केवळ दीड तासांत 182 मिलिमीटर पाऊस झाला होता. तीसुद्धा ढगफुटीच होती. पुण्यातील तो 118 वर्षांनंतर सर्वाधिक पाऊस झाल्याचा विक्रम होता. (24 ऑक्टोबर 1892 रोजी 118 मिलिमीटर पाऊस एका तासात पुण्यात झाल्याची नोंद होती.)उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात गेल्या पंचवीस वर्षांत अशा सुमारे वीस मोठय़ा घटना झालेल्या आहेत. उत्तराखंडमधील पिथोरगड परिसरात मालपा खेड्यात 17 ऑगस्ट 1998 रोजी झालेल्या ढगफुटीने 250 लोक मृत्युमुखी पडले होते. भूस्खलन होऊन शारदा नदीचे पात्रच अडले गेले होते. या घटनेत प्रसिद्ध ओडिशा नर्तिका प्रतिमा बेदी यांचे निधन झाले होते.मान्सूनचा बदलता पॅटर्न पाहता भारताने आता अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. भारताचे अर्थकारण हे शेतीशी निगडित राहणार आहे. शेती पावसाच्या पाण्यावर आणि त्यात होणार्‍या बदलांवर अवलंबून असणार आहे. जागतिक हवामान संघटनेने आशियाई देशांत होणार्‍या ढगफुटीचा अलर्ट किमान सहा तास अगोदर देण्याची जबाबदारी भारताकडे सोपविली आहे. भारत नोडल एजन्सीच आहे. केंद्रीय हवामान बदल मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या 146 वर्षे कार्यरत असणार्‍या भारत हवामान शास्त्र विभागावर हे काम सोपविलेले आहे. सध्या आपल्याकडे असलेल्या डॉपलर रडार पद्धतीने हवामानाचे विश्लेषण करून आपल्या घराच्या छतांवर किंवा शेतावर एक तासानंतर किती मिलीमीटर पाऊस होणार आहे, हे अचूक सांगता येते. मात्र, गुणवत्तापूर्ण हवामानाची माहिती देण्याचे काम जबाबदारीने होत नाही. नेहमीच अंदाज व्यक्त केला जातो, असे सांगितले जाते. अलीकडच्या वीस वर्षांत मान्सूनचा पॅटर्न बदलतो आहे. वार्‍याची दिशा, वेळ आणि वेग लक्षणीयरित्या बदलते आहे. केंद्रीय मंत्रालयानेदेखील हे स्वीकारले आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांच्या मतानुसार 1941 पासून मान्सून 1 जूनला सुरू होतो आणि परतीचा  पाऊस 30 सप्टेंबरनंतर अशी ठरलेली तारीख आहे. आता परतीच्या पावसाला उशीर होणार आहे. 1941 चे हवामान शास्त्र आणि 1971 मध्ये तयार करण्यात आलेले रेन फोरकास्टिंग मॅन्युअल आता कालबाह्य झाली आहेत, असे त्यांनी मान्य केले आहे.हा बदल स्वीकारून आणि भारताने स्वीकारलेली रडार डॉपलर सिस्टीम आत्मसात करून तिचा कार्यक्षमपणे वापर करायला हवा आहे. त्याचा उपयोग मान्सूनच्या पावसाचा अंदाज बांधण्याबरोबरच त्यातील बदलांची नोंद घेण्यासाठी करता येईल. पीक पद्धतीचाही फेरविचार करावा लागेल. तसा शहरीकरणातही ढगफुटीच्या धोक्याचा विचार करता येणार आहे. हैदराबादला पुन्हा एकदा फटका बसलाच आहे. पुण्यात 2010 मध्ये पाच दिवसांच्या अंतराने दोनवेळा फटका बसला. चेन्नई शहराच्या परिसरात दोन वर्षांपूर्वी परतीच्या पावसाने ढगफुटी झाली तेव्हा निम्मे शहर पाण्यात गेले होते. यापेक्षा मोठा धोका धरणांचा आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठय़ा ढगफुटीचा प्रकार घडला आणि भरलेल्या धरणांत अचानक पाणी आले, तर  शंभर वर्षे झालेल्या अनेक धरणांना धोका निर्माण होऊ शकतो. रात्री-अपरात्री होणार्‍या ढगफुटीचा अचूक वेध रडार डॉपलर यंत्रणेनेच घेता येऊ शकेल. उत्तराखंडमध्ये  17 ऑगस्ट 1998 च्या मध्यरात्री आणि 18 ऑगस्टच्या पहाटे तीन वाजता ती ढगफुटी झाली होती. परिणामी दरडी कोसळून सुमारे दहा लाख टन दगड मातीचा ढिगारा  शारदा नदीत कोसळला होता. अलीकडे 1 जुलै 2016 रोजी पिथोरगढ जिल्ह्यातच चोवीस तासांत 1372 मिलिमीटर पाऊस ढगफुटीने झाला होता. अखेरचे एकच उदाहरण देता येईल. मुंबईचा अनुभव फार जुना नाही. 26 जुलै 2005 रोजी दहा तासांत 940 मिलिमीटर पाऊस झाला तेव्हा एक हजार जणांचा मृत्यू झाला होता. संपत्तीचे झालेले नुकसान वेगळेच तेव्हा या हवामान बदलाची नोंद घेत अधिक व्यापक पातळीवर काम करावे लागेल. चक्रीवादळ किंवा अतिवृष्टी किंबहुना ढगफुटीचा धोका कायम असणार आहे. - वसंत भोसले(लेखक ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत. 

vasant.bhosale@lokmat.com